शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कारकलच्या शेतकऱ्यांनी ऊस शेतीला नवा पर्याय देत शतावरीपासून मिळवले एकरी ९ लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 12:29 IST

यशकथा : उसाच्या शेतीला नव्या पर्याय शोधणाऱ्या कारकलच्या शेतकऱ्यांना शतावरीने मोठा आधार दिला आहे.

- नारायण चव्हाण (सोलापूर)

पारंपरिक शेतीला छेद देऊन कारकल (ता. दक्षिण सोलापूर) येथील शेतकऱ्यांनी शतावरी या औषधी वनस्पतीच्या उत्पादनाला प्राधान्य दिले. त्यातून मोठा आर्थिक लाभ झाला आणि उसाच्या शेतीला नवा पर्याय शतावरीमुळे निर्माण झाला आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यात भीमा आणि सीना या दोन नद्यांच्या परिसरात ऊस आणि केळीच्या पिकांना शेतकरी अधिक प्राधान्य देतात. नद्यांना पाणी सोडले नाही, तर या नगदी पिकांचे मोठे नुकसान होते. तसेच वषार्नुवर्षे ऊस या एकाच पिकाची लागवड केल्याने जमीन नापीक बनत चालली आहे. त्यात ऊस उत्पादनातून मिळणारी रक्कम ही अत्यंत तोकडी असते. अशा स्थितीत उसाच्या शेतीला नव्या पर्याय शोधणाऱ्या कारकलच्या शेतकऱ्यांना शतावरीने मोठा आधार दिला आहे. ही औषधी वनस्पती नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरली आहे.

पुणे येथील एका कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचे सोमनाथ छपरे यांनी कारकलच्या शेतकऱ्यांशी संपर्क साधला. मल्लिकार्जुन गवसणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना उत्सुकतेपोटी शतावरीच्या शेतीची माहिती मिळवली. त्यातून नवा प्रयोग म्हणून शतावरीची लागवड करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला.  मल्लिकार्जुन गवसणे, अनिल बिराजदार, गुंडेराव कुलकर्णी, राजशेखर बोराळे, सोमनाथ बिराजदार या पाच शेतकऱ्यांनी औषधी आणि सुगंधी वनस्पतीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीशी करार केला.

उत्तम निचऱ्याची, डोंगराळ, मुरमाड, रेताड, उजाड माळरान अशा जमिनीत शतावरीचे पीक जोमदार येते. पाणी साठवणारी, खोलगट, पाणथळ आणि चुनखडीची जमीन शतावरीसाठी उपयुक्त ठरत नाही.  हवामानाच्या दृष्टीने ही समशीतोष्ण, उष्ण आणि दुष्काळी भागात शतावरीच्या पिकाची चांगली वाढ होते. कमी पाण्यात येणारे शतावरी पीक आहे. ठिबक सिंचनाच्या साहाय्याने आठवड्यातून एकदा पाणी दिले. जास्तीचे पाणी या पिकाला मारक ठरते. कंपनीने कारकल येथील लागवडीसाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनींची पाहणी केली. शेतकऱ्यांनी या कंपनीसोबत उत्पादन प्रति किलो ५० रुपये दराने विकत घेण्याचा करार केला होता. त्यांना रोपे पुरविली. १५ महिन्यांनंतर शतावरीची जेसीबीच्या साह्याने काढणी करण्यात आली. रोपागणिक सरासरी १५ ते १७ किलो वजनाची शतावरीची मुळी झाली. एका एकरात १८ मे टन शतावरीचे उत्पादन झाले.

कंपनीने करारानुसार वाहतूक खर्च सोसून ही शतावरीची मुळी विकत घेतली. त्यातून शेतकऱ्यांना एकरी ९ लाख रुपये मिळाले. खर्च वजा जाता एकरी ७ लाख रुपये त्यांच्या हाती पडले. अन्य कोणत्याही पिकापेक्षा हे उत्पादन निश्चितच अधिक मिळाले. त्यामुळे ही शेती पारंपरिक शेतीला छेद देणारी ठरली आहे. इतर पिकांच्या तुलनेत शतावरीने आम्हाला खुप उत्पन्न मिळवून दिले. यामुळे आमचा विश्वास बळावला असल्याचे उत्पादक मल्लिकार्जुन गवसणे म्हणाले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी