शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

सोलापूरातील शेतकरी गटांनी मार्केटिंग, प्रोसेसिंग क्षेत्रात सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी,  ‘आत्मा’च्या वतीने विक्रेता-खरेदीदारांचे संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 11:26 IST

शेतकºयांनी उत्पादित केलेला माल बाजारपेठेत त्वरित विकला जावा. बाजारातील मागणीनुसार शेतमालाचा पुरवठा होण्यास मार्केटिंग व्यवस्था सक्षम असणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देशेतकरी समूह गटांनी मार्केटिंग व प्रोसेसिंग क्षेत्रात पुढे येणे गरजेचेआत्मामार्फत अशी संमेलने तालुकास्तरावर आणि प्रत्यक्ष शेतकरी गटांच्या ठिकाणी व्हावीतशेतकरी मोठ्या कष्टाने फळ, भाजीपाला यासह अन्य पिकांचे उत्पादन घेतोरिलायन्स फ्रेस २००७ पासून सोलापूर जिल्ह्यात काम करत आहे

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर: शेतकºयांनी उत्पादित केलेला माल बाजारपेठेत त्वरित विकला जावा. बाजारातील मागणीनुसार शेतमालाचा पुरवठा होण्यास मार्केटिंग व्यवस्था सक्षम असणे आवश्यक आहे. यासाठी शेतकरी समूह गटांनी मार्केटिंग व प्रोसेसिंग क्षेत्रात पुढे येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प अंतर्गत कृषी विभागाचा आत्मामार्फत विक्रेता-खरेदीदार संमेलनाचे आयोजन येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विक्रेता खरेदीदार व शेतकºयांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार,आत्माचे उपसंचालक बरबडे, प्रतापसिंह परदेशी, रिलायन्स फ्रेशचे रवींद्र दिवे उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, शेतकरी मोठ्या कष्टाने फळ, भाजीपाला यासह अन्य पिकांचे उत्पादन घेतो, पण त्याला विक्री व्यवस्था अवगत नसल्याने त्याच्या मालाचा उठाव होत नाही. शेतमालाची विक्री न झाल्याने त्याला नुकसानीस सामोरे जावे लागते. एकटा शेतकरी हा मार्केटिंग व प्रोसेसिंगमध्ये काम करु शकत नाही. शासनाने यासाठी शेतकरी समूह गट योजना, आठवडा बाजार योजना सुरु केली आहे. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकºयांनी लाभ घ्यावा. केवळ योजनेसाठी अनुदान मिळते हा उद्देश न ठेवता बाजाराची गरज तपासून त्या पद्धतीने उत्पादन घेऊन आपले जीवनमान उंचवावे.दिवे यांनी आपल्या भाषणातून रिलायन्स फ्रेस २००७ पासून सोलापूर जिल्ह्यात काम करत आहे. केळी, डाळिंब, लिंबू, पपई बरोबरच अन्य भाजीपाला व फळांची खरेदी करण्यात येत आहे. शेतकरी गटांनी चांगल्या दर्जाचा व उच्च प्रकारचा माल उपलब्ध करुन दिल्यास त्याची खरेदी रिलायन्स फ्रेशमार्फत करण्यास प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट केले. या कार्यक्रमात प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संमेलनास रिलायन्स फ्रेश, एडीएम ग्रो इंडस्ट्रिज लातूर, ग्रँट थॉर्टन पुणे, दाळ मिल असोसिएशन प्रतिनिधी, जिल्हाधिकारी शेतकरी गटाचे प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते. -------------------------... तर शेतकरी क्रांती घडवतील- कृषी विभागाच्या आत्मामार्फत अशी संमेलने तालुकास्तरावर आणि प्रत्यक्ष शेतकरी गटांच्या ठिकाणी व्हावीत. या ठिकाणी शेतकºयांना माल काढणी, हाताळणी, पॅकिंग याबाबतचे मार्गदर्शन करणे तितकेच महत्त्वाचे आहे.  शेतकºयांना चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन झाल्यास शेतकरी, शेतकरी गट मार्केटिंगमध्ये क्रांती घडवतील, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. परदेशी यावेळी म्हणाले की, मार्केट यार्डामध्ये आपला माल विकला जातो अशी धारणा आजवर शेतकºयांची होती. पण शेतकºयाला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी, त्याच्या उत्पादनाला चांगला भाव देण्यासाठी शासनाने आठवडा बाजार योजना सुरू करून त्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. शासनाने सुरू केलेला गट शेती उपक्रम स्तुत्य असून शेतकरी गटांनी उत्पादन, प्रोसेसिंग ते विक्रीपर्यंत सर्व कामात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय