शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

युरोपच्या अभ्यास दौऱ्यात असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पॅरिसमध्ये केला छत्रपतींचा जयजयकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 20:10 IST

शिवजयंतीचे औचित्य साधून पॅरिस मधील महलात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीक्षेत्र मार्डी चे भूमिपुत्र काशिनाथ कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

सोलापूर : राज्यातील शेती अधिक आधुनिक, स्पर्धात्मक व शाश्वत करण्याच्या उद्देशाने कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सन २०२५-२६ अंतर्गत “राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे” ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत युरोप देशांचा अभ्यास दौऱ्यास १५ रोजी प्रारंभ झाला असून राज्यातील विविध जिल्ह्यांतील एकूण ५२ प्रगतिशील शेतकरी व दोन कृषी अधिकारी या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले आहेत. शिवजयंतीचे औचित्य साधून पॅरिस मधील महलात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीक्षेत्र मार्डी चे भूमिपुत्र काशिनाथ कदम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी युरोप अभ्यास दौऱ्यात असलेल्या बावन्न शेतकऱ्यांच्या व दोन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छत्रपतींचा जयजयकार करण्यात आला. भगवे फेटे, भगवे झेंडे अन् शिवरायांची प्रतिमेने पॅरिस शहरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले.

याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन प्रतिमेचे तसेच तिरंगा व भगव्या ध्वजाचे पूजन मान्यवर अधिकारी व शेतकरी बंधू भगिनींच्या उपस्थितीत झाले.  या अभ्यास दौऱ्यास प्रस्थान होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या गटाशी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला होता. हा अभ्यास दौरा फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी आणि नेदरलँड्स या प्रगत कृषी देशांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्या दरम्यान शेतकरी आधुनिक पीक पद्धती, यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, दुग्धव्यवसाय, सहकारी प्रक्रिया उद्योग, हरितगृह तंत्रज्ञान, जलसंधारण व हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या शेती पद्धतींचा प्रत्यक्ष अभ्यास करणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Farmers in Paris Celebrate Shivaji Maharaj During Europe Tour

Web Summary : Maharashtra farmers on a European agricultural study tour celebrated Shivaji Jayanti in Paris with traditional fervor. The tour, organized by the state's agriculture department, includes 52 farmers and aims to expose them to advanced farming techniques in France, Switzerland, Germany, and the Netherlands.