शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
2
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
3
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
4
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
5
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
6
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
7
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
8
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
9
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
10
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
11
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
12
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
13
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
14
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
15
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
16
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
17
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
18
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
19
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना

समांतर पाईपलाईनच्या कामात बाधित शेतकºयांना नुकसानभरपाई मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 12:21 PM

सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेकडे प्रस्ताव पाठविणार : २० कोटींची तरतूद करण्याची मागणी

ठळक मुद्देस्मार्ट सिटी कंपनी आणि एनटीपीसीच्या माध्यमातून टाकण्यात येणाºया उजनी ते सोलापूर समांतर पाईपलाईनची निविदा नुकतीच मंजूरनवी ११० किलोमीटरची पाईपलाईन पूर्णपणे जमिनीखालून टाकण्यात येणार जलशुध्दीकरण केंद्रासह इतर कामे स्वतंत्रपणे करण्यात येणार

सोलापूर : उजनी ते सोलापूर समांतर पाईपलाईन काम करताना काही शेतकºयांची जमीन बाधित होणार आहे. या शेतकºयांना पीक नुकसानभरपाई मिळणार आहे. त्यासाठी महापालिकेने २० कोटी रुपयांची तरतूद करावी, असा प्रस्ताव प्रशासनाकडून सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात येणार आहे. 

स्मार्ट सिटी कंपनी आणि एनटीपीसीच्या माध्यमातून टाकण्यात येणाºया उजनी ते सोलापूर समांतर पाईपलाईनची निविदा नुकतीच मंजूर करण्यात आली आहे. हैदराबाद येथील पोचमपाड कंपनीला हे काम मिळाले आहे. १५ आॅगस्टपर्यंत या कामाला सुरुवात करण्याचे स्मार्ट सिटी कंपनीचे नियोजन आहे. सध्याची पाईपलाईन ही काही ठिकाणी रस्त्यालगत उघड्यावर आहे तर काही ठिकाणी जमिनीखालून गेली आहे. पण नवी ११० किलोमीटरची पाईपलाईन पूर्णपणे जमिनीखालून टाकण्यात येणार आहे. यापूर्वी पाईपलाईन करताना बाधित शेतकºयांना नुकसानभरपाई देण्यात आलेली नव्हती.

नव्या पाईपलाईनसाठी खोदाई करावी लागणार आहे. त्यातून शेतकºयांच्या पिकांचे नुकसान होणार आहे.  या शेतकºयांना शासन निमयानुसार नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. मनपा प्रशासनाच्या अंदाजनुसार यासाठी १५ ते २० कोटी रुपये लागणार आहेत. ही रक्कम महापालिकेने द्यावी, असे स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीत सुचविण्यात आले आहे. त्यानुसार मनपा प्रशासनाने यासंदर्भात प्रस्ताव तयार केला असून तो मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात येणार आहे. 

जलशुद्धीकरण केंद्र स्वतंत्र करणार- समांतर पाईपलाईनच्या मूळ प्रस्तावात पंपगृह, पाईपलाईन, जॅकवेल यासह पाकणी आणि सोरेगाव येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासह इतर कामांचा समावेश होता. त्यातून समांतर पाईपलाईनच्या मूळ निविदेची किंमत वाढत होती. त्यामुळे जलशुध्दीकरण केंद्रासह इतर कामे स्वतंत्रपणे करण्यात येणार आहेत. त्यासाठी पुन्हा प्रस्ताव तयार करुन निधी मागण्यात येणार आहे. मनपा प्रशासनाने शहरात नव्याने अंतर्गत पाईपलाईन करणे, दोन एमबीआर उभारणे, जलशुद्धीकरण केंद्रे उभारणे यासाठी ३११ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असेही अधिकाºयांकडून सांगण्यात आले. 

आर्थिक अडचण असली तरी घ्यावा लागेल निर्णय - महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने अनेक विकासकामांना तरतूद करता आलेली नाही. वाढती लोकसंख्या विचारात घेता शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी समांतर पाईपलाईनची गरज आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला यावर निर्णय घ्यावाच लागेल, असे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSmart Cityस्मार्ट सिटीwater transportजलवाहतूकUjine Damउजनी धरण