शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

तुरीचा तोरा तीन हजाराने घसरला, शेतमालांची अशी अवस्था : शेतकऱ्यांचे पुरते हाल

By काशिनाथ वाघमारे | Updated: January 8, 2024 19:36 IST

शेतीमालाची ही कधी नव्हे त्या अवस्थेने राज्यातील शेतकऱ्यांचे पुरते हाल सुरू आहेत. 

सोलापूर : निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर जमिनीवर आले, १० महिन्यांपासून दूध खरेदी दर घसरल्याने जनावरे सोडून देण्याची वेळ आली, तेल आयातीमुळे सोयाबीन बाजार चार हजारांवर आला, इथेनॉल उत्पादनावर बंदी घातल्याने ऊस उत्पादकांचे अवसान गळाले, इतर शेती उत्पादनाचे बाजारात हाल सुरू असताना ११ हजारांचा टप्पा पार केलेल्या तुरीचा तोरा आठ हजारांपर्यंत खाली आला. शेतीमालाची ही कधी नव्हे त्या अवस्थेने राज्यातील शेतकऱ्यांचे पुरते हाल सुरू आहेत.  दोन- तीन वर्षे कोरोनामुळे संपूर्ण शेती आतबट्ट्याची ठरली होती.  २०२३ या वर्षात शेतीमालाची अवस्था दयनीय झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात खासगी दूध संघांनी इशारा देत दूध खरेदी दरात कपात करण्यास सुरुवात केली. गाय दूध खरेदी ४० रुपयांवर गेलेला दर २५ रुपयांवर आला. मागील १० महिन्यापासून दूध व्यवसाय तोट्यात केला जात आहे. सोलापूर जिल्ह्याचा विचार केला असता मागील महिन्यात बार्शी बाजार समितीत तूर क्विंटलला ११ हजार ५०० रुपये व वैराग व सोलापूर बाजार समितीत ११ हजार तर अक्कलकोट व दुधनी बाजार समितीत १० हजाराच्या पुढे दर गेला होता. आता तोच दर तीन हजारांहून अधिक कमी झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे तुरीचे भावबाजार समिती आजचा भावअक्कलकोट ८१००- ९१००सोलापूर ८१०० ९२००बार्शी ८०००- ९०००वैराग ७८००- ८५००दुधनी ८५०० -९१०० शेतक-यांचा शेतीमाल विक्रीला बाजारात येण्यास सुरुवात झाला की खरेदी दर कमी होण्यास सुरुवात होते. गेली वर्षभर ऊस, सोयाबीन, कांदा व दूध उत्पादक शेतकरी दराच्या घसरणीमुळे अडचणीत आले आहेत. आता तुरीच्या दरात तीन ते साडेतीन हजार रुपयाने घसरण झाली आहे. शेतकऱ्यांसाठी ठोस कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे.- सुहास पाटीलरयत क्रांती संघटना

टॅग्स :Solapurसोलापूर