शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सालगड्याच्या गळ्याला कोयता लावून लुटले

By काशिनाथ वाघमारे | Updated: July 14, 2023 21:11 IST

महिलेच्या गळयातील चेन पळवली ..

सोलापूर : सालगडी पती-पत्नीला कोयता, चाकूचा धाक दाखवत लुटल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास सांगोला- एखतपूर रोडवर प्रकाश कांबळे यांच्या शेतातील वस्तीवर घडला.या लुटमारीत चोरट्याने गळ्यातील ७० हजार रुपयांचे १८ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १५० ग्रॅम चांदीच्या दागिन्यांसह रोख ४० हजार रुपये नेले. जाताना पती-पत्नीला घरात कोंडले, तसेच घराशेजारील वृद्ध महिलेच्या गळ्यातील ४० हजारांचे ११ ग्रॅम सोन्याची चेन हिसकावून तेथून धूम ठोकली. या घटनेत पती-पत्नी जखमी झाले आहेत. 

याबाबत, भीमराव रामभाऊ शिंदे (रा.सांगोला) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी चार अनोळखी चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली आहे. सांगोला-एखतपूर रोडवर भीमराव शिंदे व रत्नमाला शिंदे हे मजूर दांपत्य प्रकाश कांबळे यांच्या सांगोला रोडवर शेतात सालगडी म्हणून कामास आहेत. गुरुवार, १३ जुलै रोजी रात्री १० च्या सुमारास भीमराव शिंदे घराच्या बाहेर ओट्यावर झोपले होते, तर पत्नी घरामध्ये दरवाजा बंद करून झोपली होती. 

दरम्यान, शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास एकाने गळ्याला चाकू लावला. जर आरडाओरडा केला तर जीवे मारीन, असे धमकावत हातातील उलट्या कोयत्याने त्यांच्या पाठीवर मारहाण केल्यामुळे घाबरून ते गप्प बसले. त्यावेळी दोघांनी त्यांच्या घराच्या दरवाजाला धक्के दिल्यामुळे दरवाजाच्या आतील कडी तुटताच तिघेजण घरात घुसले. पत्नीस दमदाटी करत दागिन्यासह रोख ४० हजार रुपये असा सुमारे १ लाख ११ रुपयांचा ऐवज चोरी करून घराबाहेर आले.महिलेच्या गळयातील चेन पळवली ..जाताना चोरटे त्यांच्या जवळच राहणारे रवींद्र गुळमिरे यांच्या घराच्या दरवाजाची आतून लावलेली कडी काढून घरात प्रवेश केला. आई शीलादेवी गुळमिरे यांच्या गळ्यातील ११ ग्रॅम सोन्याची चेन हिसकावून तेथून धूम ठोकली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर