शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या पार्टीतील सदस्यालाच सरपंचपद मिळावे यासाठी माजी सरपंचाने केल्या बनावट नोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 10:53 IST

रोपळे गावचे आरक्षण अनुसुचित जमाती महिलेसाठी राखीव : तिघांविरुध्द गुन्हा दाखल

पंढरपूर : रोपळे (ता. पंढरपूर) येथील माजी सरपंच दिनकर नारायण कदम यांनी स्वत:च्या पार्टीतून नवीन निवडणून आलेल्या महिला सदस्याला सरपंच मिळावे, या उद्देशाने मालमत्ता रजिस्टरमध्ये खाडाखोड केली आहे. यामुळे त्यासह अन्य दोघांवर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहीतीनुसार, कृष्णा हरी नवले (वय ४९, रा. विसावा मंदिर, इसबावी, पंढरपूर) हे रोपळे गावचे ग्रामसेवक आहेत. रोपळे (ता. पंढरपूर) गावातील मालमत्ता करास पात्र असलेल्या इमारती व जमिनीची नोंद (नमुना नं. ८) घेण्याकरीता ग्रामपंचायत मध्ये रजिस्टर ठेवण्यात आले आहे. ते इतर गावाला असताना त्यांना २८ जानेवारी २०२१ रोजी रोपळे येथील ग्रामपंचायत क्लार्क दशरथ कदम यांनी फोन करुन कळविले की, काल रात्री साडेआठच्या दरम्यान पुर्वीचे सरपंच दिनकर नारायण कदम (रा.रोपळे, ता.पंढरपूर) यांनी नमुना ८ चे रजिष्टर शिपाई नितीन जाधव याचे करवी त्यांचे घरी मागवून घेतले होते. व त्यानंतर दशरथ कदम यांना देखिल त्यांनी घरी बोलावून घेवून त्या रजिष्टर मध्ये त्यांनी मालमत्ता क्र. १५७९ मधील मालमतेचे वर्णन, मालकाचे नावाचे ठिकाणी असलेली महाराष्ट्र शासन पाटबंधारे विभाग व भोगवटा करणाराचे नावाचे ठिकाणी असलेले विक्रांत दिलीप चव्हाण (अतिक्रमण ) या नोंदीवर तसेच इतर सर्व रकान्यामधील नोंदीवर व्हाईटनर लावलेला होता. त्यांनी मला दमदाटी करुन माझे हस्ताक्षरामध्ये मालकाचे नाव या रकान्यामध्ये मंगल अर्जुन भोसले यांचे नाव भोगवटा करणाराचे नाव या रकान्यामध्ये खुद्द असे लिहण्यास व उर्वरीत रकान्यांमध्ये फेरफार नोंदी करुन घेतल्या आहेत. व पुढे त्यांनी सरपंच ग्रामपंचायत रोपळे बु।।, ता.पंढरपूर,जि.सोलापूर असा शिक्का मारुन सही केली आहे असे नवले यांना सांगितले. परंतू ते रजिष्टर हे केवळ मालमत्ता आकारणी करण्याकरीताचे असल्याने त्याबाबत नवले यांना काही गांभीर्य वाटले नाही. त्यामुळे त्यांनी वरिष्ठांना काही माहिती दिलेली नव्हती. त्यानंतर २२ फेब्रुवारीच्या दुपारी १२ वाजता नुतन ग्रामपंचायत सदस्य नितीन कदम, हणुमंत कदम व इतर दोन सदस्य असे रोपळे येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कार्यालयात आले. व त्यांनी माझेकडे नमुना ८ रजिष्टर पाहण्याकरीता त्याची मागणी केली. त्यांनी रजिष्टर पाहीले. त्यावेळी रजिस्टरवर खाडाखोड कोणी केली आहे याबाबत विचारणा केली. माजी सरपंच दिनकर नारायण कदम यांनी केली असल्याचे सांगितले. तेंव्हा त्यांनी या नोंदीचे आधारे त्यांचे गटातील शशिकला दिलीप चव्हाण यांनी मंगल अर्जुन भोसले यांचेकडून मालमत्ता खरेदी घेतल्याचे दाखविले आहे. सध्या रोपळे गावचे सरपंच पदाचे आरक्षण हे अनुसुचित जमाती महिला करीता निघालेले असून रोपळे ग्रामपंचायत मध्ये शशिकला दिलीप चव्हाण या एकटयाच निवडूण आलेल्या असून त्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले असल्याने त्यांना त्या पदाचा लाभ घेता येणार नाही व ते रद्द होईल म्हणून सरपंच दिनकर कदम यांनी खाडाखोड करुन सदरची मालमत्ता मंगल अर्जुन भोसले यांचे नावे दाखवून ती शशिकला दिलीप चव्हाण यांना खरेदी दिल्याचे कागदोपत्री दाखविले आहे असे म्हणाले. या प्रकरणाची खात्री करुन नवेल यांनी दिनकर नारायण कदम, दशरथ मधुकर कदम, नितीन धनाजी जाधव (सर्व रा.रोपळे,ता.पंढरपूर) यांच्या विरुध्द तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकPoliticsराजकारणCrime Newsगुन्हेगारी