शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवरील मैत्रीचा शेवट झाला पोलीस ठाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 15:40 IST

लंडनच्या मित्राने घातला नऊ लाख ६८ हजारांचा गंडा; सोलापुरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठळक मुद्देसोलापुरातील महिलेस दिली अ‍ॅन्टी ड्रग अ‍ॅन्ड टेरेरिस्ट डिपार्टमेंटची धमकीवैशाली लक्ष्मण शिंदे (वय ३७, रा. पत्रकार नगर, यशोधन बंगला, सिव्हिल हॉस्पिटल) या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कामाला आहेतवैशाली शिंदे यांनी याबाबत मित्रांकडे चौकशी केली असता हा सर्व फसवणुकीचा प्रकार असल्याचे सांगण्यात आले

सोलापूर : फेसबुकवर मैत्री झाली, व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटींग झाले आणि गिफ्ट पाठवतो म्हणून नऊ लाख ६८ हजारांच्या फसवणुकीनंतर त्याचा शेवट पोलीस ठाण्यात झाला. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

वैशाली लक्ष्मण शिंदे (वय ३७, रा. पत्रकार नगर, यशोधन बंगला, सिव्हिल हॉस्पिटल) या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत. वैशाली शिंदे यांच्या फेसबुकवर ७ मे २0१९ रोजी अ‍ॅलेक्झांडर स्टिव्ह यु.के. लंडन या व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, ती त्यांनी स्वीकारली. लंडनच्या व्यक्तीने शिंदे यांचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर मागितला. व्हॉट्सअ‍ॅपवर त्याने एक गिफ्ट पाठवित आहे, असा मेसेज दिला. वैशाली शिंदे यांनी गिफ्टला नकार दिला; मात्र ११ मे २0१९ रोजी अ‍ॅलेक्झांडर स्टिव्ह याने फोन करून तुझ्या पत्त्यावर गिफ्ट पाठवले आहे असे सांगितले. 

१३ मे २0१९ रोजी वैशाली शिंदे यांना फोन आला व बोलणाºया व्यक्तीने मी दिल्ली एअरपोर्टवरून बोलतो आहे. तुमचे गिफ्ट दिल्ली एअरपोर्टवर आले आहे, ते घेण्यासाठी ३५,००० रुपये ट्रान्स्पोर्ट चार्ज भरावे लागेल असे सांगितले. वैशाली शिंदे यांनी १३ मे २0१९ रोजी विजया बँकेच्या खात्यावर पैसे भरले. त्याच दिवशी पुन्हा फोन आला आणि सांगण्यात आले की तुमचे गिफ्ट फोडण्यात आले असून, त्यामध्ये ६० हजार पाँड एवढी रक्कम आहे. ते काढण्यासाठी आणखी ८७ हजार रुपये सांगितले यावर विश्वास ठेवून वैशाली शिंदे यांनी १४ मे रोजी पुन्हा कोटक बँकेच्या खात्यावर पैसे भरले. पैसे भरल्यानंतर पुन्हा फोन आला व तुमच्या ई-मेल आयडीवर आरबीआयकडून मेल आला आहे, तो चेक करून त्यातील फॉर्म भरा व आम्हाला परत पाठवा असे सांगण्यात आले.

पुन्हा ५ लाख ५१ हजार रुपये युनायटेड नेशन अ‍ॅन्टी टेरेरिस्ट डिपार्टमेंटची आहे. ती तुम्हाला भरावी लागेल असे सांगितले. २९ मे २०१९ रोजी एक लाख ९१ हजार रुपये भरा अन्यथा तुमच्यावर अ‍ॅन्टी ड्रग अ‍ॅन्ड टेरेरिस्ट डिपार्टमेंट भारत सरकारला कळवेल आणि तुमच्यावर कारवाई होईल अशी धमकी दिली. भीतीपोटी त्यांनी तीही रक्कम भरली. शेवटी पुन्हा सोळा लाख ५0 हजार रुपये भरण्याची मागणी केली तेव्हा वैशाली शिंदे यांनी याबाबत मित्रांकडे चौकशी केली असता हा सर्व फसवणुकीचा प्रकार असल्याचे सांगण्यात आले. तपास पोलीस निरीक्षक बहिरट करीत आहेत. 

विश्वास बसेल असा ई-मेल पाठवला...- वैशाली शिंदे यांना प्रत्येकवेळी काही ना काही कारण सांगून पैसे भरण्यास सांगितले जात होते. २ ते ३ वेळा आरबीआयचा मेल आला असेल तो पाहा आणि फॉर्म भरा असे सांगितले जात होते. वैशाली ज्यावेळी मेल पाहत होत्या तेव्हा तो हुबेहूब भारत सरकारच्या आरबीआयचा (भारतीय रिझर्व्ह बँकेचा) वाटत होता. ६0 हजार पाँड मिळण्याच्या आशेपोटी आणि शासनाकडून होणाºया कारवाईच्या भीतीपोटी वैशाली शिंदे या रक्कम भरत गेल्या.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी