शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कुंपणानच शेत खाल्लं; एक्साईजचा जवान अँटी करप्शनच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2023 13:33 IST

तडजोडीत २० हजार ठरले: जामिनासाठी तीस हजाराच्या लाचेची मागणी

विलास जळकोटकर, सोलापूर

सोलापूर : दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल झालेल्या तक्रारदाराला जामिनासाठी सहकार्य म्हणून तीस हजाराची लाच मागितली. तडजोडीने वीस हजार रुपये घेण्यावर ठरले. या प्रकरणी लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जवानाला अटक करण्यात आली. 

मलंग गुलाब तांबोळी (वय ३३ वर्षे, सध्या रा. प्रकाश नालवार यांचे स्वामी विवेकानंद नगर, ओम गर्जना चौक, सैफुल, सोलापूर) असे या जवानाचे नाव आहे.यातील तक्रादाराच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने कारवाई करुन दारुबंदी कायद्यान्वये तक्रार दिल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदला होता. या प्रकरणी जामीन मिळवण्यासाठी तक्रारदाराने प्रयत्न सुरु केले होते. राज्य उत्पादन शुल्कच्या सोलापूर येथील कार्यालयात कार्यरत असलेल्या मलंग गुलाब तांबोळी यांनी या प्रकरणात मदत करण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी केली. 

यावर दोघांमध्ये तडजोड झाली आणि २० हजाराच्या रक्कमेवर तडजोड झाली. दरम्यान, तक्रारदाराने लाच लुचपत पथकाच्या कार्यालयाशी संपर्क साधून माहिती दिली. पथकाकडून १४ ऑक्टोबर रोजी तक्रारीची शहानिशा करण्यात आली. यात तथ्य असल्याचे आढळून आले. सोमवारी रात्री उशिरा सापळा लावून संबंधीत जवानाला अटक करण्यात आली. विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस नाईक प्रमोद पकाले, अतुल घाडगे, उमेश पवार, स्वप्नील सन्नके, चालक उडाणशिव यांच्यासह ॲन्टीकरप्शनच्या पथकांनी केली. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याच्या कलम ७ प्रमाणे विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी