शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

नॉन क्रिमीलेअर नसेल तरी नो टेन्शन, विद्यार्थ्यांनो हमीपत्रावर घ्या ॲडमिशन!

By संताजी शिंदे | Updated: June 29, 2023 15:33 IST

शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने अर्जाची पोहोच पावती व हमीपत्र घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, असे आदेश काढले आहेत.

सोलापूर : दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर सध्या प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. ११वीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी विविध दाखले काढले जात आहेत. मात्र, सर्व्हर डाऊन असल्याने पालक व विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने अर्जाची पोहोच पावती व हमीपत्र घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, असे आदेश काढले आहेत.

२ जून रोजी इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्याकरिता पालकांची लगबग सुरू झाली. प्रवेशाकरिता जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमीलेअर, रहिवास दाखला, आदी दाखल्यांची आवश्यकता असते. पालकांनी दाखले मिळण्यासाठी महा-ई-सेवा केंद्रामार्फत ऑनलाइन अर्ज केले आहेत. शासनाच्या सर्व्हरवर अचानक लोड आल्यामुळे दाखले निघेनासे झाले आहेत. जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांकडून दाखल्यांवर सह्या होत आहेत, मात्र त्याची प्रिंट निघत नाही.

एकीकडे शहर व जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये २६ जुलै रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरिता १ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. अशा परिस्थितीमध्ये आवश्यक दाखले मिळत नसल्याने पालक व विद्यार्थ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. सर्व्हर डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना दाखले मिळत नाहीत अशी तक्रार शासनाच्या शालेय शिक्षण मंत्रालयाकडे गेली होती. शासनाने याची दखल घेतली असून, शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग पुणे कार्यालयाला पत्र पाठवून सूचना केल्या आहेत.

तीन महिन्यांची मुदतवाढ द्या!विद्यार्थ्यांना उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमीलेअर) प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, असेही पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. हे पत्र शालेय शिक्षण मंत्रालयातील कक्ष अधिकारी विवेक सपकाळ यांच्या सहीने काढण्यात आले आहे.

दोन दिवसांत सर्व्हरची समस्या सुटेल : शमा पवारसंपूर्ण महाराष्ट्रातून दाखल्यांसाठी अर्ज येत आहेत, त्यामुळे अचानक सर्व्हरवर ताण आला आहे. दाखला निघण्यात अडचणी येत आहेत, मात्र यावर सध्या काम सुरू आहे. मुंबई कार्यालयाकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. दोन दिवसांत सर्व्हरची समस्या सुटेल अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :Educationशिक्षण