शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

निवडणुकीनंतरही पाणीप्रश्नावर भाजप-राष्ट्रवादीत पुन्हा जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:20 IST

आ. परिचारक यांनी केंद्र सरकारमुळे तर भगीरथ भालके यांनी राज्य सरकारमुळे पाणी आले असे सांगत आहेत. याची चर्चा पंढरपूर-मंगळवेढ्यातील ...

आ. परिचारक यांनी केंद्र सरकारमुळे तर भगीरथ भालके यांनी राज्य सरकारमुळे पाणी आले असे सांगत आहेत. याची चर्चा पंढरपूर-मंगळवेढ्यातील अनेक ग्रुपवर सुरू आहे. निवडणुकीनंतरही मंगळवेढ्यात पाणी प्रश्नावरून संघर्ष पाहावयास मिळू लागला आहे.

मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी शुक्रवारी पोहचले. त्यानंतर आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रसिद्धीप्रमुखांकडून म्हैसाळ योजनेतून सोडलेल्या पाण्याचे पूजनासंदर्भात प्रसिध्द पत्रक काढले. यात त्यांनी १९९२-९३ पासून बंद असलेली मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ योजना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत राज्यातील एकूण ७ प्रकल्पांचा समावेश केला होता. त्या समाविष्ट यादीत मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचा समावेश केला. त्या अनुषंगाने योजना कार्यान्वित होण्यासाठी पंतप्रधानांनी साधारणत: ३ हजार कोटी रुपये मंजूर करुन दिले. या योजनेअंतर्गत शुक्रवारी मारोळी, जंगलगी, चिक्कलगी, शिरनांदगी येथे पाणी सोडून चाचणी करण्यात येत आहे.

दुसरीकडे भगीरथ भालके यांनी सोशल मीडियावरील अकाऊंटवरुन मारोळी येथे जलपूजन केल्याचे छायाचित्र व मजकूर टाकून राष्ट्रवादीनेच पाणी प्रश्न सोडवल्याचा दावा केला आहे. स्व. आमदार भारत भालके यांचे दक्षिण भागातील गावांना म्हैसाळचे पाणी मिळावे हे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. जयंत पाटील यांनी म्हैसाळचे पाणी सोडण्याचे आदेश दिले. यामुळे म्हैसाळचे पाणी मारोळी, शिरनांदगी हद्दीतमध्ये दाखल झाले, असे म्हटले आहे.

----

म्हैसाळ योजनेच्या पाण्याचे आज सर्वात प्रथम मी पाणीपूजन केले. स्व. आ. भारत भालके यांनी या योजनेचे पाणी शिरणांदगी तलावापर्यत आणले होते. आता त्याच्या खालच्या काही गावांना या योजनेचे पाणी मिळणार आहे. या पाण्यातून शिरणांदगी तलाव भरून घेण्यात यावा, यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी करणार आहे. भविष्यात या योजनेचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहे.

- भगीरथ भालके,अध्यक्ष विठ्ठल सहकारी साखर कारखाना

----

या योजनेचे काम युती सरकारच्या काळात गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात सुरू झाले होते. त्यानंतर गेल्या २० वर्षांपासून राज्य सरकारने काहीही न केल्याने ही योजना निधीअभावी रखडली. गत दोन वर्षात केंद्र सरकारने प्रधानमंत्री जलसंपदा योजनेअंतर्गत राज्यातील रखडलेल्या ७ प्रकल्पांना निधी उपलब्ध करून दिला. त्यामधून हे रखडलेले काम झाले आहे. आता सोडलेल्या पाण्यातून कालव्याची चाचणी होणार आहे. हे पाणी आठ ते दहा दिवस चालेल. त्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती, बदल केले जातील. पुढच्या काळात पाणी मागणी अर्ज भरून घेऊन लाभार्थी ११ गावांमधील शेतकऱ्यांना रोटेशनप्रमाणे पाणी मिळेल. शेवटच्या टोकापर्यतच्या प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळेपर्यंत आमचा प्रयत्न सुरु राहील.

- प्रशांत परिचारक, आमदार, विधानपरिषद सदस्य

फोटो

१४जलपूजन-आवताडे, परिचारक

म्हैसाळ योजनेतून मंगळवेढा तालुक्यात पाणी पोहोचल्यानंतर जलपूजन करताना आ. समाधान आवताडे, आ. प्रशांत परिचारक यांच्यासह पदाधिकारी व शेतकरी.

फोटो

१४जलपूजन-भालके

ओळी

म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्यात पोहोचल्यानंतर जलपूजन करताना श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके व अन्य पदाधिकारी.

----

१४जलपूजन