शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर महापालिकेचा अनुमान; शंभर चाचणीत वीस जणांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 12:10 IST

सोलापूर शहरातील परिस्थिती; तीन टक्के रुग्णांची काळजी घेण्याचे प्रशासनासमोर आव्हान, नवीन हॉस्पिटल लागणार...

ठळक मुद्देपुण्याच्या धर्तीवर रॅपिड अ‍ॅन्टीजन किट वापरून चाचण्या वाढविण्याचे आदेश दिले आहेतकोणत्या भागात हा प्रयोग करायचा याबाबत महापालिकेचा आरोग्य विभाग नियोजन करीत आहेज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यांना लगेच ताब्यात घेऊन क्वारंटाईन किंवा लक्षणावरून उपचाराची व्यवस्था करण्याची यंत्रणा

सोलापूर : सोलापुरात आतापर्यंत झालेल्या शंभर व्यक्तींच्या चाचण्यांमधून वीस जण कोरोनाबाधित आढळत असल्याचा महापालिका  आरोग्य विभागाचा अनुमान आहे. यातील तीन टक्के लोकांमध्ये तीव्र लक्षणे असतील, त्यांच्या उपचाराची काय व्यवस्था करता येईल, यावर अधिकाºयांचे नियोजन सुरू झाले आहे. 

शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ५० हजार रॅपिड अ‍ॅक्शन किटद्वारे चाचण्या करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पण या चाचण्या एकाच वेळी एकाच भागात करण्यासाठी मोठी यंत्रणा लागणार आहे. ही यंत्रणा कोणती असेल व त्याची जबाबदारी कशी ठरवावी, याचा आराखडा तयार केला जात आहे. ५० हजार चाचण्या घेतल्यावर सहा हजार लोक बाधित आढळतील. यात तीव्र लक्षणाचे प्रमाण ३ टक्के असणार आहे. त्यामुळे साडेचार हजार रुग्णांना कोविड केअरमध्ये दाखल करावे लागेल तर सुमारे १५00 लोकांना उपचारासाठी अ‍ॅडमिट करण्यासाठी कोविड हॉस्पिटलची सोय करावी लागणार आहे. त्यामुळे सध्याची क्वारंटाईन व उपचाराची व्यवस्था सोडून नवीन यंत्रणा उभी करावी लागणार आहे.

पुण्याच्या धर्तीवर रॅपिड अ‍ॅन्टीजन किट वापरून चाचण्या वाढविण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे या किटच्या खरेदीची सोलापूर महापालिकेने आॅर्डर दिली असल्याची माहिती  महापालिकेच्या प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

एरिया ठरविण्याचे काम सुरू...कोणत्या भागात हा प्रयोग करायचा याबाबत महापालिकेचा आरोग्य विभाग नियोजन करीत आहे. ज्या भागात जादा रुग्ण आढळून येत आहेत, तो भाग कमीत कमी दिवसात कसा कव्हर करता येईल, यासाठी लागणारे मनुष्यबळ, वाहने, स्वॅब घेतले की जागेवर चाचणी करण्यासाठी लागणारी यंत्रणा, ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्यांना लगेच ताब्यात घेऊन क्वारंटाईन किंवा लक्षणावरून उपचाराची व्यवस्था करण्याची यंत्रणा कशी राबवायची हे ठरविण्यात येत आहे. 

अ‍ॅम्ब्युलन्स, हॉस्पिटलच गरजेचेबाधित रुग्णांची कोविड केअर व हॉस्पिटलपर्यंत वाहतूक करण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर्स व जेवण, निवास आणि इतर सुविधांसाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. यासाठी मुबलक निधी मिळाल्यावरच हे शक्य होणार असल्याचे अधिकारी सांगत आहेत. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यMedicalवैद्यकीय