शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवेढा येथील बसवेश्वर स्मारकासाठी १५ एकर जागा निश्चित, उर्वरित जागेत कृषी पर्यटन केंद्र उभारण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 17:43 IST

या संदर्भातील आराखडा जिल्हा नियोजन विभागाकडून सादर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. 

ठळक मुद्देमागील महिन्यात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत बसवेश्वर स्मारकासाठी आढावा बैठक घेण्यात आलीहोटगी रोडवरील विमानतळावरून विमानसेवा सुरु करण्यास अडथळा ठरणारी सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी हटविण्याचे आदेश विमानतळ विकास कंपनीने दिले

सोलापूर : मंगळवेढाजवळील कृषी विभागाच्या ६५ एकर जागेपैकी १५ एकर जागेवर महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक तर उर्वरित जागेत कृषी पर्यटन केंद्र उभारण्यात येणार आहे. या संदर्भातील आराखडा जिल्हा नियोजन विभागाकडून सादर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. 

मागील महिन्यात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत बसवेश्वर स्मारकासाठी आढावा बैठक घेण्यात आली                 होती. या बैठकीत त्यांनी आराखडा सादर करण्याचे आदेश दिले होते.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, बसवेश्वर स्मारकाबाबत सोमवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत स्मारकाचा आराखडा सादर करण्यात आला. कृषी पर्यटन केंद्राचा आराखडाही सादर झाला आहे. तो शासनाकडे पाठविण्यात येईल. --------------------विमान प्राधिकरणाने सुचवावी जागा- होटगी रोडवरील विमानतळावरून विमानसेवा सुरु करण्यास अडथळा ठरणारी सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी हटविण्याचे आदेश विमानतळ विकास कंपनीने दिले आहेत. जिल्हा प्रशासनाने कारखाना प्रशासनाला पर्यायी चिमणी उभारण्याची सूचना केली आहे. त्यावर कारखाना प्रशासनाने नवी चिमणी उभारण्यासाठी आता विमानतळ विकास कंपनीने कारखान्यातील दुसरी जागा सुचवावी, असे पत्र दिले आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळ विकास कंपनी आणि सिध्देश्वर सहकारी कारखाना यांची संयुक्त बैठक लवकरच घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी  डॉ.राजेंद्र भोसले यांनी     सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुख