शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ज्जे बात! इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम आता जिल्हा परिषद शाळेत; CEO मनिषा आव्हाळेंचा मोठा निर्णय

By appasaheb.patil | Updated: May 30, 2024 17:50 IST

जिल्ह्यात १७५ शाळांनी सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याची मागणी प्राथमिक शिक्षण विभागाकडे केली होती.

सोलापूर : सीईओ पदाचा पदभार घेतल्यापासून सीईंओ मनिषा आव्हाळे यांनी जिल्हा परिषदेत अनेक आमुलाग्र बदल केले. मागील काही महिन्यात त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या कार्याचे कौतुक राज्यभर होत आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील १६५ शाळांमध्ये यंदाच्या वर्षापासून सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याचा मोठा निर्णय सीईओ आव्हाळे यांनी घेतला आहे. त्यामुळे गावखेड्यातील मुलंही आता इंग्रजी माध्यमाचा अभ्यास शिकणार असल्याचे सांगण्यात आले. 

दरम्यान, जिल्ह्यात १७५ शाळांनी सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याची मागणी प्राथमिक शिक्षण विभागाकडे केली होती. त्यानुसार यावेळी जिल्ह्यातील १६५ शाळांमध्ये  सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच त्यासाठी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेकडून पुस्तके व शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचेही ठरले. गुढीपाडवा पट वाढवा या उपक्रमांतर्गत शाळांची पटसंख्या १० टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दिष्ट होते. सद्यस्थितीमध्ये  इयत्ता पहिलीचे ७० नोंदणी झालेली आहे. उर्वरित पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी केली. 

जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यात माढा येथे एकमेव माध्यमिक शाळा आहे. या शाळेतील वर्ग खोल्या व भौतिक सुविधांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.शेळगी येथील सावित्रीबाई फुले मुलीचे वसतिगृहामधील विद्यार्थीनीसाठी भौतिक सुविधा व सुधारणा करण्याबाबत सुचना करण्यात आली.शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ मध्ये शाळा पूर्व तयारी शाळेस सर्व सुविधा व स्वच्छतेबाबत खात्री करण्यासाठी पर्यवेक्षीय यंत्रणेनी शाळा सुरू होण्यापूर्वी भेटी देऊन अहवाल सादर करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूर