शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिर परिसरातील अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 14:35 IST

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात मंदिर पोलीस आणि नगरपरिषदेच्या अधिकाºयांनी संयुक्त अतिक्रमण हटाव मोहीम राबविली आहे. यामुळे मंदिर ...

ठळक मुद्देपोलीस प्रशासन, नगरपरिषदेची संयुक्त मोहीम रस्ते झाले मोकळे, भाविकांचा मार्ग सुकरश्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी रोज ५० हजारांच्या आसपास भाविक येतात

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात मंदिर पोलीस आणि नगरपरिषदेच्या अधिकाºयांनी संयुक्त अतिक्रमण हटाव मोहीम राबविली आहे. यामुळे मंदिर परिसरातील रस्ते मोकळे झाले आहेत.

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी रोज ५० हजारांच्या आसपास भाविक येतात. त्याचबरोबर यात्रा कालावधीत लाखो भाविक येतात. यामुळे शहरासह मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. यामुळे रस्ते देखील अपुरे पडतात. त्याचबरोबर मंदिर परिसरातील व्यापाºयांनी रस्त्यावरच आपली दुकाने थाटली आहेत. तसेच इतर गाळेधारक देखील रस्त्यावर विविध साहित्यांची विक्री करतात. यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. रस्त्यावरुन ये-जा करताना भाविकांना अडचणी निर्माण होतात. गर्दीचा फायदा घेत अनेक चोर भाविकांच्या साहित्यांची चोरी करतात.

यामुळे श्री विठ्ठल मंदिर पोलीस चौकीचे पो.नि.विश्वास साळोखे, पो.नि. राजेश देवरे, पोसनि हर्षद गालिंदे, पोसनि परशुराम कोरके, पोउपनि पंडित जाधव, पोसफौ अण्णासाहेब वने, पासफौ जगन्नाथ कुलकर्णी, पोहेकॉ सतीश सर्वगोड, पोकॉ फिरोज मणेरी, पोकॉ वामन यलमार, पोकॉ सुनील कुलकर्णी, पोकॉ सोनाली इंगोले, पोना मनीषा भोसले व अन्य पोलीस कर्मचाºयांनी मंदिर परिसरातील व्यापाºयांनी केलेले अतिक्रमण काढले. त्याचबरोबर हॉकर्सवर देखील कारवाई केली. ही कारवाई न.पा.च्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या साह्याने केली असल्याची माहिती पोसनि हर्षद गालिंदे यांनी दिली.

नियंत्रण रेषेतच असावी दुकाने- पंढरपूर नगरपरिषदेने व पोलीस प्रशासनाने मंदिर परिसरातील दुकानदारांना नियंत्रण रेषा टाकून दिली आहे. परंतु त्याबाहेर अनेक दुकानदार आपली दुकाने थाटतात. यामुळे रस्त्यावर अतिक्रमण होत असल्याचे दिसून येत आहे. आता या नियंत्रण रेषेत आल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले़ 

मंदिर परिसरातील व्यापाºयांनी अतिक्रमण करु नये. त्यांनी त्यांचे व्यवसाय त्यांच्या अधिकृत जागेतच करावेत. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.- विश्वास साळोखेपोलीस निरीक्षक, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpurपंढरपूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस