शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरडींचे भावनिक पत्र; पप्पा काळजी घ्या... तुमची खूप आठवण येतेय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 11:45 IST

अशीही काळजी: वैद्यकीय अधिकारी असलेल्या पित्याला चिमुरडींचे भावनिक पत्र

ठळक मुद्देआराध्या प्रार्थना करतोआराध्या प्रार्थना करतो की, आपण सगळे जण मिळून कोरोनाला पळवून लावू की, आपण सगळे जण मिळून कोरोनाला पळवून लावूकोरोनामुळे तुम्ही घरी आला नाहीत. सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले आहे. तुम्ही जेवता कसे? असे अनेक प्रश्न या चिमुकल्यांनी पत्रातून केले

महेश कुलकर्णी कुरुल : मोहोळ तालुक्यातील अंकोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. विनोद अभिवंत यांना त्यांच्या दोन लहान  मुलींनी भावनात्मक पत्र लिहून खुशाली कळवली आहे़ ‘पप्पा. तुमची खूप आठवण येते.. तुम्हाला भेटावंसं वाटतंय़.. पण, कोरोनामुळे तुम्ही घरी येऊ शकत नाही.. तरीही तुम्ही तुमची काळजी घ्या’ असे भावनिक  पत्र डॉक्टर पित्यासाठी त्यांच्या दोन लहान चिमुकल्यांनी लिहून पाठवले आहे. 

 कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला आहे. नागरिकांच्या काळजीप्रति डॉक्टर वैद्यकीय तपासणी करून सेवा करीत आहेत, पोलीस प्रशासन जनजागृती करून जमावबंदीची अंमलबजावणी करून लोकांना घरीच थांबण्यास भाग पाडत आहेत. लहान मुले वडिलांच्या आगमनाची प्रतीक्षा करताहेत. 

डॉ. विनोद अभिवंत हे मोहोळ तालुक्यातील देवडी येथील असून, सध्या निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून अंकोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कार्यरत आहेत. लहान मुलींच्या शिक्षणासाठी त्यांचे कुटुंब सोलापूर येथे राहते. 

डॉ. अभिवंत आठवड्यातून एक-दोनदा सोलापूरला जातात. त्यांना तनिष्का (चौथी) व आराध्या (पहिली) अशा दोन मुली आहेत. ग्रामीण भागातील सर्दी, खोकला, ताप व अन्य आजारांवर उपचार घेण्यासाठी रुग्ण वाढले असल्याने डॉ. अभिवंत हे पंधरा दिवसांपासून घरी गेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या दोन्ही लहान मुलींनी आपल्या वडिलांना उद्देशून पत्र लिहून काळजी व्यक्त केली आहे. 

कोरोनामुळे तुम्ही घरी आला नाहीत. सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले आहे. तुम्ही जेवता कसे? असे अनेक प्रश्न या चिमुकल्यांनी पत्रातून केले आहेत़

आपण कोरोनाला पळवून लावू- त्या भावनिक पत्रात या मुलींनी या काळात आपला हट्ट बाजूला ठेवल्याचे सांगतात़ त्या म्हणतात ‘हा कोरोना कधी संपायचा आणि कधी आम्ही तुमच्या कुशीत येणार? पप्पा, तुम्ही तुमची काळजी घ्या. आमचा खाऊ संपला तर संपू द्या. पण तुम्ही घरी लवकर या. कोरोनामुळे तुम्ही बाहेरून डब्बापण मागवू शकत नाही? मग जेवण कसे करणार? हे आठवल्यावर आम्हाला जेवण जात नाही, म्हणून मी आणि आराध्या प्रार्थना करतो की, आपण सगळे जण मिळून कोरोनाला पळवून लावू. तुमच्या लाडक्या आराध्या व तनिष्का.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdocterडॉक्टर