शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात; मार्चनंतर सोलापुरातून धावणार विजेवरील रेल्वे 

By appasaheb.patil | Updated: September 18, 2020 12:01 IST

मध्य रेल्वे : १०८ किमीचे काम पूर्ण, उर्वरित काम सहा महिन्यांत होणार

ठळक मुद्देमध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात २०१२ साली सुरू करण्यात आलेले  दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आलेवाडी ते सावळगी या ५० किलोमीटर व दौंड ते वाशिंबे या ५९ किमीपर्यंतचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झालेदौंड ते वाशिंबे या मार्गावर विजेवरील रेल्वे इंजिनची चाचणी घेण्यात आली अन् ती यशस्वी झाली

सोलापूर : लॉकडाऊनमधील प्रवासी गाड्या बंदचा फायदा घेत रेल विकास निगम कंपनीने हाती घेतलेले मध्य रेल्वे विभागातील दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम वेगाने पूर्ण होत आहे़ ३४० किलोमीटरपैकी १०९ किमी विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे़ उर्वरित २३१ किमीचे काम प्रगतिपथावर असून, तेही मार्च २०२१ अखेर पूर्ण होणार आहे़ मार्चनंतर सोलापूर विभागातून विजेवरील रेल्वे गाड्या धावण्यास सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात २०१२ साली सुरू करण्यात आलेले  दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे़ याशिवाय दुहेरीकरणाबरोबरच विद्युतीकरणाचे काम सुरू झाले़ सद्यस्थितीला दौंड ते सोलापूर व सोलापूर ते वाडीपर्यंत दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान, वाडी ते सावळगी या ५० किलोमीटर व दौंड ते वाशिंबे या ५९ किमीपर्यंतचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले़ त्यामुळे दौंड ते वाशिंबे या मार्गावर विजेवरील रेल्वे इंजिनची चाचणी घेण्यात आली अन् ती यशस्वी झाली़ आता वाडी ते सावळगी व सावळगी ते दुधनीपर्यंतच्या झालेल्या कामावरील चाचणी येत्या काही दिवसात होणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली. 

गाड्यांची संख्या अन् वेग वाढणारमध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील रेल्वेमार्ग पूर्वी एकेरी होता, त्यानंतर दुहेरीकरणाची मागणी झाली. २०१२ साली दुहेरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली़ नऊ वर्षांनंतर दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम पूर्ण होत आहे़ संपूर्ण काम पूर्ण झाल्यावर सोलापूर विभागातून धावणाºया सर्वच गाड्या या विजेवर धावणार आहेत़ त्यामुळे नक्कीच या गाड्यांचा वेग वाढणार असून, गाड्यांच्या संख्येतही वाढ होणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाºयांनी दिली़ 

दुहेरीकरण व विद्युतीकरण काम पूर्ण करण्यासाठी संबंधित रेल विकास निगम कंपनीला सूचना दिल्या आहेत़ आता ठरल्याप्रमाणे मार्च २०२१ अखेर हे काम पूर्ण होणार आहे़ काम पूर्ण झाल्यानंतर चाचण्या यशस्वी झाल्यानंतर निश्चित विजेवरील रेल्वे धावेल़ विद्युतीकरणाचे उर्वरित काम लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत़- शैलेश गुप्ता, विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे, सोलापूर विभाग़

स्थानक़...                   या मुदतीत होणार काम पूर्ण

  • वाडी ते सावळगी (५० किमी) -         काम पूर्ण
  • सावळगी ते दुधनी (३६ किमी) -         नोव्हेंबर २०२०
  • दुधनी ते सोलापूर (६४ किमी) -        मार्च २०२१
  • दौंड ते वाशिंबे (५९ किमी) -        काम पूर्ण
  • वाशिंबे ते कुर्डूवाडी (५३ किमी) -        आॅक्टोबर २०२०
  • कुर्डूवाडी ते सोलापूर (७८ किमी)-     मार्च २०२१
टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे