शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बारामती परिमंडलातील ४७ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 12:22 IST

महावितरणच्या थकबाकी वसुली मोहिमेचा तडाखा, गुरुवारी, शुक्रवारीवीजबिल भरणा केद्रें सुरू राहणार

ठळक मुद्दे२९ व ३० मार्चला महावितरणचे वीजबिल भरणा केंद्रे सुरू ठेवण्यात येणार कबाकी वसुल करण्यासाठी 'शून्य थकबाकी'ची विशेष मोहिम सुरू

सोलापूर : महावितरणच्या बारामती परिमंडलातील वीजबिलांचे थकबाकीदार असलेल्या ४७ हजार ४३८ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांचा वीजपुरवठा या महिन्यात शून्य थकबाकी' मोहिमेत खंडित करण्यात आला आहे. ही मोहीम सुटीच्या दिवशीही सुरू राहणार असल्याने दि. २९ व ३० मार्चला महावितरणचे वीजबिल भरणा केंद्रे सुरू ठेवण्यात येणार आहेत.

बारामती परिमंडलात वीजबिलांची थकबाकी वसुल करण्यासाठी 'शून्य थकबाकी'ची विशेष मोहिम सुरू आहे. या महिन्यात आतापर्यंत बारामती, सातारा व सोलापूर मंडलात ११ कोटी १२ लाख रुपयांच्या थकबाकीपोटी ४७ हजार ४३८ वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

बारामती मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा ३ हजार १८९ थकबाकीदारांचा वीजपुरवठा २ कोटी १६ लाख रुपयांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. सातारा मंडलातील ४ हजार ३४३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा ८५ लाखांच्या थकीत वीजबिलांमुळे खंडित करण्यात आला आहे. तर सोलापूर मंडलातील ३९ हजार ९०६ थकबाकीदारांचा वीजपुरवठा ८ कोटी ११ लाखांच्या थकीत वीजबिलांमुळे खंडित करण्यात आला आहे. 

        या मोहिमेमुळे थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून बारामती परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे दि. २९ व ३० मार्चला सुटीच्या दिवशी सुरू राहणार आहेत. वीजग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. थकीत वीजबिल भरण्यासाठी स्थानिक वीजबील भरणा केंद्रांसह घरबसल्या 'आॅनलाईन' पेमेंटसाठी महावितरणची  वेबसाईट तसेच मोबाईल अ?ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.

         बारामती परिमंडलातील शहरांसह ग्रामीण भागात थकबाकीदार ग्राहकांच्या वीजजोडण्या खंडित करण्याचे व सुटीच्या दिवशीसुद्धा ही कारवाई आक्रमकपणे सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच एप्रिल महिन्यातही थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू राहणार असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणPuneपुणे