शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

गालबोट न लागता निवडणूक प्रथमच शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 12:36 IST

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ; १३ हजार ७० मतदार वाढले : गतवर्षीच्या तुलनेत टक्केवारी घटली

ठळक मुद्दे२०१४ मध्ये अक्कलकोट विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीने झाली होती

शिवानंद फुलारी

अक्कलकोट : २०१४  साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत अक्कलकोटविधानसभा निवडणुकीत यंदा नव्याने १३ हजार ७० मतदार वाढले आहेत. आता याचा फायदा कोणाला अन् तोटा कोणाला होणार? याची चर्चा सुरू झाली आहे. यंदा काही ठिकाणच्या केंद्रांवर मतदारांना काही किरकोळ समस्यांना तोंड द्यावे लागले़ प्रचारातही काही उमेदवारांनी काही मागील मुद्दे उपस्थित केले होते. त्यामुळे ते फारसे प्रभावी ठरलेले नाही. एकूणच २० वर्षांनंतर गालबोट न लागता निवडणूक शांततेत झाली़ आरोप, प्रत्यारोपाविना ही निवडणूक पार पडली. त्यामुळे मतदानानंतर तालुक्यात वातावरण शांत राहिले आहे.

२०१४ मध्ये अक्कलकोट विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीने झाली होती. आरोप-प्रत्यारोप, हाणामारी अशा अनेक घटना घडल्या़ तापलेल्या वातावरणातही ६३.९४ टक्के मतदान झाले होते.

यंदा नव्याने झालेल्या मतदार नोंदणीला प्रतिसाद मिळाला आहे़ तरीही ६२.०२ टक्के मतदान झालेले आहे. यंदा वाढलेले नवमतदार कोणाच्या बाजूने जाणार हे निकालाअंतीच कळणार आहे. फायदा-तोटा कोणाला होणार? अशी चर्चा आता रंगत आहे.

विधानसभा मतदारसंघातील अनेक बूथवर पिण्याचे पाणी आणि ज्येष्ठांना बराच वेळ रांगेत उभे राहण्याबरोबरच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले़ तसेच दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था नव्हती़ अशा अनेक अडचणींना तोंड देत मतदारांनी मतदान केले. 

जुनेच मुद्दे उगाळले- या निवडणुकीत काँग्रेस व भाजपने एकरूख उपसा सिंचन व देगाव जोडकालवा योजना लवकरात लवकर पूर्ण करू, अशी ग्वाही देत मागील दहा वर्षांपासूनचे तेच ते मुद्दे प्रचारात उपस्थित केले. भाजपचे सचिन कल्याणशेट्टी यांनी मागील १५ वर्षांत रखडलेल्या सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी आणि अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी या तिन्ही नगरपालिकेच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरत असल्याचे सांगितले़ तडवळ-तिलाठी-कडबगाव, दुधनी रेल्वे उड्डाणपूल करू, अक्कलकोट शहरातील भुयारी गटार योजना करूश अशी अनेक आश्वासने त्यांनी दिली आहेत.

गैरसोयींना तोंड देत केले मतदान - अक्कलकोट शहरातील एनटीसी शाळा मतदान केंद्र (क्र. १५३, १५४) मध्ये पावसामुळे पाणी साचले होते. अक्कलकोट नगरपालिकेचे मुख्याधिकारी आशा राऊत यांच्या सूचनेनंतर मोटार लावून पाण्याचा उपसा केला. त्या ठिकाणी चिखल, गळकी पत्रे, ज्येष्ठांची गैरसोय झाली. भोसगे गावीसुद्धा मतदान केंद्र चक्क धोकादायक इमारतीत होते. अशाच प्रकारे कासेगाव, मुस्ती या ठिकाणीही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले़

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणakkalkot-acअक्कलकोट