शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक अडचणीचे अहवाल पाहता नागपूर, बुलडाणा जिल्हा बँकांच्या निवडणुकीला स्थगिती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 12:18 IST

आर्थिक अडचणीचे कारण : ५३७ कोटी मदतीचा डोस देऊनही आजारीच

सोलापूर : आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यासाठी शासनाने ५३७ कोटी रुपये मदतीचा डोस देऊनही विदर्भातील वर्धा, नागपूरबुलडाणा या बँका अडचणीत आहेत. राज्य निवडणूक प्राधिकरणाने निवडणुका जाहीर केल्या असल्या तरी आर्थिक अडचणीचे अहवाल पाहता या बँकांच्या निवडणुकीला स्थगिती मिळण्याची शक्यता आहे. तसे अहवाल शासनाकडे दिले आहेत.

सहकार खात्याच्या राज्य निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील १६ जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. यामध्ये विदर्भातील नागपूरबुलडाणा या जिल्हा बँकांचा समावेश आहे. वर्धा जिल्हा बँकेची निवडणूक जाहीरच केली नाही. वर्धा जिल्हा बँकेला यावर्षी २२८ कोटी तोटा व ९८ टक्के एनपीए आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा एनपीए ८० टक्के तर तोटा ३३३ कोटी, तर बुलडाणा जिल्हा बँकेचा तोटा २५३ कोटी व एनपीए ५४ टक्के इतका आहे. या तिन्ही जिल्हा बँकांना शासनाने भागभांडवल म्हणून ५३७ कोटी रुपये मदतीचा डोस दिला होता. तरीही या बँका आजारातून बाहेर पडल्या नाहीत. आर्थिक अडचणीत बँका असताना निवडणुका लावण्यात आल्या आहेत. या जिल्हा बँकांनी निवडणूक प्राधिकरण व शासनाला आर्थिक परिस्थितीचा अहवाल सादर केला आहे.

शासनच निर्णय घेईल...

  • निवडणूक प्राधिकरणाकडे याबाबत विचारणा केली असता या बँकांचे अहवाल मिळाले. मात्र, निवडणुकीबाबत शासनच निर्णय घेईल, असे सांगण्यात आले. आम्ही मात्र त्यांना निवडणूक घेण्यासाठी कळविले आहे.
  • 0 बुलडाणा व नागपूर या बँकावर प्रशासक असून येथील पालकमंत्र्यांनी निवडणुका स्थगित करण्यास शासनाला कळविले असल्याचे सांगण्यात आले.
  • 0 पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, उस्मानाबाद, मुंबई, नाशिक व धुळे- नंदुरबार तसेच जळगाव आणि अमरावती या बँकांच्या निवडणुकीची प्रक्रिया मात्र सुरू केली आहे.

केंद्र शासनाने सहकार खाते निर्माण केल्याने व हे खाते अमित शहा यांच्याकडे दिल्याने घाईने राज्यातील १६ जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका लावण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले. केंद्राने काही बदल केले तर जिल्हा बँकांच्या निवडणुकीची व सत्ताधाऱ्यांची अडचण होईल, असा कयास आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्रbuldhanaबुलडाणाnagpurनागपूर