शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ऊस पीक ठिबकखाली आणण्यासाठी राज्यातील आठ धरणांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 16:59 IST

ऊस पिकाखालील क्षेत्र ठिबकखाली आणण्यासाठी राज्यातील टेंभू उपसा सिंचन, उजनी, मुळा, निम्न माना, हतनूर, उर्ध्वपूस, कानोळी, नाला(नागपूर) व अंबोली(सिंधुदुर्ग) या प्रकल्पांची प्रायोगिक तत्त्वावर निवड केली

ठळक मुद्देनाबार्डकडून कर्ज उपलब्ध करण्यात येणार राज्यात उसाचे सर्वसाधारण ९ लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्रसध्या सव्वादोन लाख हेक्टर ठिबक ऊस क्षेत्र

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २६ : ऊस पिकाखालील क्षेत्र ठिबकखाली आणण्यासाठी राज्यातील टेंभू उपसा सिंचन, उजनी, मुळा, निम्न माना, हतनूर, उर्ध्वपूस, कानोळी, नाला(नागपूर) व अंबोली(सिंधुदुर्ग) या प्रकल्पांची प्रायोगिक तत्त्वावर निवड केली असून, प्रतिहेक्टरी ८५ हजार ४०० दोन टक्के दराने शेतकºयांना कर्जरुपाने दिले जाणार आहेत. राज्यात विशेषत: पश्चिम महाराष्टÑात वरचेवर ऊस पिकाचे क्षेत्र वाढत आहे. उसासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून, ठिबकचा वापर केला तर किमान ४० टक्के पाण्याची बचत होईल असा अभ्यासकांचा अंदाज आहे. राज्यातील एकूण उपलब्ध पाणी साठ्यांपैकी सुमारे ७० टक्के पाणी हे सिंचनासाठी वापरले जात असल्याचा शासनाचा दावा आहे. एक-दोन वर्षांनंतर राज्याच्या विविध भागात कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होते.   त्यामुळे ठिबक सिंचनाचा अवलंब केला तर दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यावर शेतीचे काहीअंशी तरी नुकसान टळण्यास मदत होणार आहे. यासाठी नाबार्डकडून कर्ज उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रतिहेक्टरी ८५ हजार ४०० च्या मर्यादेत  पाच वर्षांच्या परतफेडीच्या अटीवर कर्ज दिले जाणार आहे. राज्य शासन, साखर कारखाना व शेतकरी  अशी संयुक्त योजना राबवली जाणार आहे.एका शेतकºयाला पाच हेक्टर मर्यादेत दिले जाणारे कर्ज राज्य व जिल्हा बँकेकडून वितरित केले जाणार आहे.--------------------- सध्या सव्वादोन लाख हेक्टर ठिबक ऊस क्षेत्र- राज्यात उसाचे सर्वसाधारण ९ लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्र.- त्यापैकी सध्या दोन लाख २५ हजार हेक्टर क्षेत्र ठिबकखाली.- उर्वरित ७.१८ लाख हेक्टर क्षेत्रापैैकी नद्या नाले, विहिरी, नैसर्गिक प्रवाह, ओढे आदीच्या पाण्यावरील क्षेत्र प्रामुख्याने ठिबकवर आणण्याचे शासनाचे आदेश आहेत.- पहिल्या टप्प्यात १७-१८ मध्ये एक लाख ५ हजार व दुसºया टप्प्यात २०१८-१९ मध्ये एक लाख ५५ हजार हेक्टर असे एकूण ३ लाख पाच हजार हेक्टर क्षेत्र ठिबकखाली आणण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.- कोकण, मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्टÑातील आठ प्रकल्पाखालील ऊस ठिबकखाली आणण्याचे उद्दिष्ट.