निवडणुकीपूर्वीच आठ नगरसेवकांचे राजीनामे मंजूर
सोलापूर : महापालिका निवडणूक २१ दिवसांवर येऊन ठेपली असताना विद्यमान आठ नगरसेवकांनी दिलेले राजीनामे आयुक्त विजयकुमार काळम यांनी सोमवारी मंजूर केले. सन २०१२ च्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे निवडणूक लढविलेल्या कुमुद अंकाराम, विठ्ठल कोटा, निर्मला नल्ला, विनायक कोंड्याल, राजकुमार हंचाटे, देवेंद्र कोठे आणि माकपचे माशप्पा विटे, महादेवी अलकुंटे यांनी इतर पक्षात प्रवेश केल्याने राजीनामे सादर केले होते. हे राजीनामे मंजूर करण्यात आल्याचे आयुक्त काळम—पाटील यांनी सांगितले. या सदस्यांची मुदत ५ मार्च रोजी संपणार होती. आणखी महिनाभराचा कालावधी असताना कालावधी पूर्ण होण्याआधीच आठ नगरसेवकांचा एकाचवेळा राजीनामा मंजूर करण्याची मनपाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.