शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर पोटनिवडणूक छाननीत आठ उमेदवारांचे अर्ज बाद; ३० उमेदवारांचे अर्ज वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 17:25 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींग

 पंढरपूर  : पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज झाली. यामध्ये 38 उमेदवारंपैकी पैकी  आठ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

अर्ज छाननी प्रक्रीयेवेळी निवडणूक निरिक्षक दिब्य प्रकाश गिरी उपस्थित होते. पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 38 उमेदवारांनी 44 नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यापैकी 30 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले. उमेदवारी अर्जांची छाननीत शितल शिवाजी आसबे, सिध्दाराम सोमाण्णा काकणकी यांचे  वय कमी असल्याने अर्ज अवैध ठरविण्यात आला. बळीराम जालिंदर बनसोडे, किशोर सिताराम जाधव , सुधाकर रामदास बंदपट्टे यांनी अनामत रक्कम कमी भरल्याने व गणेश शिवाजी लोखंडे यांनी अनामत रक्कम न भरल्यामुळे अर्ज अवैध ठरविण्यात आला. मतदार संघाबाहेरील सूचक असल्याने सतिश विठ्ठल जगताप यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. तसेच पोपट हरी धुमाळ या उमेदवाराचा अर्ज मान्यता प्राप्त पक्ष नसल्याने व एकच सूचक दिल्याने  उमेदवारी अर्ज अवैध ठरवला आहे.

पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी भगिरथ भारत भालके (नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी), समाधान महादेव आवताडे (भारतीय जनता पार्टी), शैला धनंजय गोडसे (बहुजन विकास आघाडी), सचिन अरुण शिंदे (स्वाभिमानी पक्ष), संजय नागनाथ माने (महाराष्ट्र विकास आघाडी), महेंद्र काशिनाथ जाधव (पिपल्स रिपब्लिकन पार्टी), राजाराम कोडींबा भोसले (बळीराजा पार्टी), सिध्देश्वर भारत आवारे (बहुजन महापार्टी) बिराप्पा मधुकर मोटे (वंचित बहुजन आघाडी) तसेच अपक्ष म्हणून संतोष महादेव माने, संदीप जनार्दन खरात, नागेश प्रकाश पवार, नागेश आण्णासो भोसले, इलियास हाजीयुसूफ शेख, रज्जाक उर्फ अब्दुलरोफ जाफर मुलाणी, संजय चरणू पाटील, अशोक ज्ञानदेव वाघमोडे,अभिजीत वामनराव आवाडे-बिचकुले, अमोल अभिमन्यू माने, सुनिल सुरेश गोरे, सिताराम मारुती सोनवले, सिध्देश्वर बबन आवताडे, मोहन नागनाथ हळणवर, रामचंद्र नागनाथ सलगर, सुदर्शन रायचंद खंदारे, कपिलदेव शंकर कोळी, सुदर्शन पांडूरंग मसुरे,मनोज गोविंदराव पुजारी, बापू दादा मेटकरी, बिरुदेव सुखदेव पापरे या उमेदवारांचे अर्ज  वैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी यावेळी दिली.        

 यावेळी  भगिरथ भारत भालके  व समाधान महादेव आवताडे यांच्या उमेदवारी अर्जावर हरकती घेण्यात आल्या होत्या निवडणूक निर्णय अधिकारी गुरव हरकती फेटाळून अर्ज  वैध ठरविण्यात आले. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुशिल बेल्हेकर, स्वप्निल रावडे उपस्थित होते .

उमेदवारी अर्जांची छाननी प्रसंगी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाचे काटेकोपणे पालन करण्यात आले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 3 एप्रिल 2021 रोजी पर्यंत असल्याचेही गुरव यांनी  यावेळी सांगितले.

 

 

टॅग्स :Solapurसोलापूरpandharpur-acपंढरपूरPandharpurपंढरपूरElectionनिवडणूक