शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लॉकडाऊनचा परिणाम; पती बेरोजगार झाल्याने पत्नीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 12:39 IST

सोलापुरातील धक्कादायक घटना; सन्मान झालेल्या फेट्याने पत्नीचा शेवट झाला

ठळक मुद्देसपना निर्मल कांबळे (वय ३५, रा. न्यू बुधवार पेठ, सम्राट अशोक चौक) असे आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव आहेतिचा पती निर्मल हा रोजच्या रोज मार्केट यार्डातील मिळेल ते हमालीचे काम करून आपले घर चालवत होतासत्कार झालेले फेटे त्यांनी घरात ठेवले होते; मात्र त्याच फेट्याने पत्नी सपना हिने गळफास घेत आपल्या जीवनाचा शेवट केला

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शहर लॉक झाले. चार-सव्वाचार महिन्याच्या लॉकडाऊनमध्ये मार्केट यार्डात हमालीचे कामही थांबले. पतीच्या जीवावर कसाबसा चालणारा संसाराचा गाडाही थांबला. काहीतरी करावं याचा विचार करून अन् संसाराचा गाडा हाकण्याचं स्वप्न रंगवणाºया सपनाने हॉस्पिटलमध्ये नोकरीही पत्करली. तेथे मिळणाºया वेतनावरही घर चालेना. आपलं स्वप्न अंधूक होत असल्याची जाणीव होत होती. त्यातच सपनाने गळफास घेऊन आपल्या आयुष्याला पूर्णविराम दिला.

सपना निर्मल कांबळे (वय ३५, रा. न्यू बुधवार पेठ, सम्राट अशोक चौक) असे आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे. तिचा पती निर्मल हा रोजच्या रोज मार्केट यार्डातील मिळेल ते हमालीचे काम करून आपले घर चालवत होता. लॉकडाऊनमुळे हाताचे कामही गेले अन् तो घरीच बसून राहिला. त्यातच त्याला दोन मुली अन् एक मुलगा. त्यांच्या पोटापाण्याबरोबर शिक्षणाची चिंता निर्मलसह सपनालाही लागून राहिली. चिंतेने अस्वस्थ झालेली सपना हिने एका हॉस्पिटलमध्ये नोकरी करुन संसाराला बळ देण्याचा निर्णय घेतला.

किमान तेथे मिळणाºया वेतनातून रोजचा खर्च भागेल आणि पतीला काम मिळेपर्यंत थोडा त्रास होईल हा विचार करुन सपनाने तेथे इमानेइतबारे ड्यूटी सुरू केली. १५ दिवसांपूर्वीच तिने हॉस्पिटलमधील नोकरी पत्करली होती. मिळणाºया वेतनातही खर्च भागेना. या चिंतेने आधीच्या चिंतेत भरच पडली. काय करावं अन् काही नाही, हे तिला समजेना. मुलाबाळाचं काळवंडलेले चेहरेही तिला पाहवत नव्हते. तिच्या मनात आत्महत्येचे विचार अधिक घट्ट होऊ लागले. शनिवारी मध्यरात्री तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

सन्मान झालेल्या फेट्याने पत्नीचा शेवट झालापती निर्मल यांचा सामाजिक कार्यक्रमादरम्यान बºयाचवेळा फेटा बांधून सत्कार झाला होता. सत्कार झालेले फेटे त्यांनी घरात ठेवले होते; मात्र त्याच फेट्याने पत्नी सपना हिने गळफास घेत आपल्या जीवनाचा शेवट केला. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरDeathमृत्यूSuicideआत्महत्याcorona virusकोरोना वायरस बातम्या