शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नाव कमावलं; जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेला मुलगा झाला आयएएस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 19:05 IST

पंढरपूर तालुक्यातील खर्डीचा राहुल चव्हाणने मिळविली दुसºया प्रयत्नात १०९ वी रँक

ठळक मुद्देराहुलचे वडील लक्ष्मण रामचंद्र चव्हाण हे अतिशय गरीब स्वकर्तृत्वावर त्यांनी अत्याधुनिक शेतीचा आधार घेत शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केलेसुधारित शेतीसाठी थोरला मुलगा कृषी पदवीधर बनविला

पंढरपूर : खर्डी (ता. पंढरपूर) येथील शेतकरी कुटुंबातील राहुल लक्ष्मण चव्हाण याने दुसºया प्रयत्नात १०९ वी रॅँक घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. 

शेतकरी कुटुंबातील लक्ष्मण रामचंद्र चव्हाण व नंदा लक्ष्मण चव्हाण या दाम्पत्याचे राहुल हे दुसरे अपत्य. त्यांना एकूण तीन अपत्ये असून, आधुनिक शेतीबरोबर तिन्ही मुलांना त्यांनी उच्च शिक्षण दिले आहे. थोरला मुलगा कल्याण हा कृषी पदवीधर आहे, तर लहान मुलगी विद्या ही राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी प्रयत्नशील आहे. 

राहुलचे प्राथमिक शिक्षण खर्डी येथील झेडपी शाळेत, माध्यमिक शिक्षण पंढरपूर येथील द. ह. कवठेकर प्रशालेत झाले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी वाडिया कॉलेज, पुणे येथून कला शाखेची भूगोल विषयात पदवी घेतली. लहानपणापासून उच्च शिक्षित अधिकारी होण्याचे त्यांचे ध्येय होते. त्यानुसार ग्रामीण भागात योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांनी पुणे व दिल्ली येथे अभ्यास केला. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.——कौटुंबिक पार्श्वभूमीराहुलचे वडील लक्ष्मण रामचंद्र चव्हाण हे अतिशय गरीब. स्वकर्तृत्वावर त्यांनी अत्याधुनिक शेतीचा आधार घेत शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले. ते स्वत: द्राक्ष बागायतदार असून, त्यांनी सुधारित शेतीसाठी थोरला मुलगा कृषी पदवीधर बनविला. वडिलांचे शिक्षण नववीपर्यंत झाले असून, आईचे प्राथमिकपर्यंतच शिक्षण झाले आहे. त्यांच्या कुटुंबात यापूर्वी पदवीपर्यंत शिक्षण झालेले कोणीही नाही. राहुलची लहान बहीण विद्या ही राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी प्रयत्नशील आहे. तर ज्येष्ठ बंधू कल्याण चव्हाण हा कृषी पदवी घेऊन शेती करत आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरupscकेंद्रीय लोकसेवा आयोगEducationशिक्षणPandharpurपंढरपूर