शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
3
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
4
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
5
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
6
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
7
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
8
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
9
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
10
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
11
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
12
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
13
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
14
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडी नाही लागणार, डब्यातही नेता येणार 
15
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
16
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
17
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
18
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
19
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
20
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

चाचणी लेखापरीक्षणामुळे सोलापूर जिल्हा बँकेच्या पदाधिकाºयांच्या अडचणी वाढणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 08:57 IST

सखोल तपासणीसाठी चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश तत्कालीन विभागीय सहनिबंधक दीपक तावरे यांनी दिले

ठळक मुद्देचाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश तत्कालीन विभागीय सहनिबंधक दीपक तावरे यांनी दिले जिल्हा बँकेच्या पदाधिकाºयांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

सोलापूर: विनातारण, असुरक्षित कर्ज वाटप करणे, अशा प्रकारचे कर्ज वसूल न करता अनावश्यक मुदतवाढ देणे, तारण साखरेची परस्पर विक्री करणे व विक्रीचे पैसे बँकेच्या कर्जापोटी भरले नसतानाही लेखापरीक्षकांनी जुजबी आक्षेप नोंदविले. यामुळेच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाशी संबंधित ४३ युनिटच्या  कर्ज मंजुरीपासून विनियोगापर्यंतच्या सखोल तपासणीसाठी चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश तत्कालीन विभागीय सहनिबंधक दीपक तावरे यांनी दिले आहेत. यामुळे जिल्हा बँकेच्या पदाधिकाºयांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप केल्याने थकबाकीचे प्रमाण वाढल्याच्या मुद्यावर बार्शीचे माजी आ. राजेंद्र राऊत हे उच्च न्यायालयात गेले होते. त्यानंतरही संचालक मंडळाशी संबंधित संस्थांचे कर्ज वसूल झाले नाही. विनातारण, असुरक्षित कर्ज वाटप करणे, अशा प्रकारचे कर्ज वसूल न करता अनावश्यक मुदतवाढ देणे, तारण साखरेची परस्पर विक्री करणे व विक्रीचे पैसे बँकेच्या कर्जापोटी भरले नाहीत. संचालकांशी संबंधित साखर कारखाने, शिक्षण संस्था व अन्य संस्थांना दिलेल्या कर्जाबाबत लेखापरीक्षकांनी जुजबी आक्षेप नोंदविले. वाढणाºया थकबाकीकडे संचालकांनी गांभीर्याने पाहिले नसल्याने बँकेच्या ‘एनपीए’ त दरवर्षी वाढच होत आहे. असे असतानाही संचालक कर्ज भरत नसल्याने नाबार्डने तपासणीत आक्षेप नोंदविले. याकडेही गांभीर्याने पाहिले नसल्याने संचालक मंडळ बरखास्त झाले व प्रशासक नियुक्त झाले. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार विभागीय सहनिबंधकांनी चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले असून विशेष लेखा परीक्षक वर्ग-१ पुण े(फिरते पथक) सी.वाय. पिंगळे यांची नियुक्ती केली आहे. पिंगळे यांना एक महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

संचालकांवरील आक्षेप

  • - अनेक साखर कारखान्यांचा नेटवर्क वजा असताना शासनाची थकहमी न घेता कर्ज मंजूर व वितरित केले. संचालक (विश्वस्त)च्या संस्थांना कर्ज देण्यासाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेतली नाही.
  • - खासगी गूळ व साखर कारखान्यांना दिलेले अल्पमुदतीचे कर्ज थकीत जाऊ नये यासाठी अनावश्यक मुदतवाढ दिली.
  • - खासगी व सहकारी साखर कारखान्यांकडे साखर साठा शिल्लक नसल्याने मालतारण कर्ज विनातारण झाले आहे. असे असताना संचालकांवर कारवाई केली नाही.
  • - बँकेच्या कर्जविषयक धोरणात संचालकांशी संबंधित संस्थांना दिलेल्या कर्जाचा समावेश नसल्याने कंपन्यांना दिलेले कर्ज धोरणाबाह्य झाले आहे. दिलेल्या कर्जाचा बोजा काटेकोरपणे नोंदविला नाही.
टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्र