शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या सकारात्मक भूमिकेमुळे सोलापूरकरांच्या अपेक्षा उंचावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 14:24 IST

अधिकाºयांची सकारात्मक भूमिका; पर्यटक अन् भाविकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणार

ठळक मुद्देपंढरपूर, अक्कलकोट, श्री सिद्धेश्वर मंदिर, तुळजापूर, गाणगापूर आदी तीर्थक्षेत्र अन् पर्यटनाच्या निमित्ताने सोलापुरात येणाºया प्रवाशांची संख्या मोठीशहराच्या बाहेर असलेल्या नाक्यावर व मुख्य ठिकाणी वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून बाहेरील वाहनांची तपासणीपोलिसांच्या सकारात्मक भूमिकेमुळे सोलापूरकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत

सोलापूर : तीर्थक्षेत्र अन् पर्यटनाच्या निमित्ताने सोलापुरात येणाºया प्रवाशांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणार असल्याची सकारात्मक भूमिका वाहतूक शाखेच्या अधिकाºयांनी घेतली. पोलिसांच्या सकारात्मक भूमिकेमुळे सोलापूरकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. 

पंढरपूर, अक्कलकोट, श्री सिद्धेश्वर मंदिर, तुळजापूर, गाणगापूर आदी तीर्थक्षेत्र अन् पर्यटनाच्या निमित्ताने सोलापुरात येणाºया प्रवाशांची संख्या मोठी आहे. बाहेरील प्रवासी हा सोलापूरच्या अर्थकारणाशी जुळलेला महत्त्वाचा घटक आहे. शहराच्या बाहेर असलेल्या नाक्यावर व मुख्य ठिकाणी वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून बाहेरील वाहनांची तपासणी होत असते. तपासणीदरम्यान प्रवाशांना कागदपत्रे दाखवावी लागतात. शिवाय अन्य बाबींची चौकशी केली जात होती. चौकशीदरम्यान बºयाच वाहनचालकांना वेगवेगळे अनुभव येत होते. या प्रकारामुळे सोलापूरची प्रतिमा मलिन होत असल्याचे निदर्शनास येत होते. ही बाब लोकमतच्या माध्यमातून मांडण्यात आली होती. 

पर्यटकांच्या प्रश्नाला अनुसरून लोकमत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या चर्चेत शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील, ग्रामीण पोलीस वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री, पाकणी महामार्ग केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश भंडारे या अधिकाºयांनी साधक-बाधक चर्चा केली. गेल्या अनेक वर्षांपासून महामार्ग व शहराच्या विविध नाक्यांवर असलेल्या तपासणीमध्ये प्रवाशांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आश्वासन अधिकाºयांनी दिले. प्रवाशांनीही नियमांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी केले. 

नाराजी निर्माण होणार नाही : रमेश भंडारे - प्रवासी महामार्गावरून जेव्हा सोलापूरकडे येतात तेव्हा त्यांनी आपली वाहने अतिवेगाने चालवू नये. वाहनांच्या वेगावर नियंत्रण असले पाहिजे. सर्व्हिस रोडव्यतिरिक्त दुसºया मार्गावरून चुकीच्या दिशेने वाहन चालवू नये. वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून चांगली वागणूक दिली जाईल. सोलापूरच्या बाबतीत प्रवाशांच्या मनात नाराजी निर्माण होणार नाही याची काळजी घेऊ, असे आश्वासन पाकणी महामार्ग केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश भंडारे यांनी दिले. 

पर्यटक सोलापुरात यावेत :कुर्री- तीर्थक्षेत्रासाठी जात असताना, सोबत कुटुंबीय असतात. प्रवास करताना सर्व कागदपत्रे सोबत असणे गरजेचे आहे. प्रवास करताना नियम असतात, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून त्रास होत असेल तर काळजी घेतली जाईल. सोलापूरला मोठ्या संख्येने पर्यटक यावा, अशीच आमची भूमिका असल्याचे वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांनी व्यक्त केले.

चांगली वागणूक देण्याचा प्रयत्न..- पर्यटक सोलापुरात येतात, त्यांच्या वाहनांना शहरात पार्किंगची समस्या निर्माण होत आहे. शहरातील व्यापारी व अन्य लोकांनी पार्किंगची सोय केली पाहिजे. आलेला प्रवासी हा रस्त्यावर थांबल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. नाइलाजास्तव काही वाहनांवर कारवाई करावी लागते. शहराच्या बाहेर असलेल्या नाक्यावर कागदपत्रांची तपासणी केली जाते. पोलिसांकडून प्रवाशांना चांगली वागणूक देण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही शहर वाहतूकचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांनी व्यक्त केले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसtraffic policeवाहतूक पोलीस