शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाºयांच्या सुमार कामगिरीमुळे सोलापूर जिल्हा परिषदेचा केवळ ५७ टक्के खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 13:01 IST

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या २०१७-१८ मधील सर्व विभागांच्या खर्चाचा ताळमेळ अद्यापही जुळलेला नाही. यावरुन अर्थ समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांच्यासह समितीच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अर्थ विभागाने सादर केलेल्या माहितीनुसार मार्च २०१८ अखेर जिल्हा वार्षिक योजना, शासन योजना आणि सेस निधीचा एकूण एकंदर खर्च ५७ टक्के झाला आहे. वार्षिक ...

ठळक मुद्देग्रामपंचायत, कृषी यासारख्या विभागांनाही व्यवस्थित खर्च करता आलेला नाहीव्यक्तिगत लाभाच्या योजनेत सर्व विभागांचा सरासरी २५ टक्के खर्च

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या २०१७-१८ मधील सर्व विभागांच्या खर्चाचा ताळमेळ अद्यापही जुळलेला नाही. यावरुन अर्थ समितीचे सभापती विजयराज डोंगरे यांच्यासह समितीच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अर्थ विभागाने सादर केलेल्या माहितीनुसार मार्च २०१८ अखेर जिल्हा वार्षिक योजना, शासन योजना आणि सेस निधीचा एकूण एकंदर खर्च ५७ टक्के झाला आहे. वार्षिक योजना, शासन योजनेचे जवळपास ३३ कोटी रुपये अखर्चित राहिले आहेत. ते शासनाकडे परत जाणार आहेत. ही जिल्हा परिषदेची सुमार कामगिरी असल्याचे अर्थ समितीच्या सदस्यांचे म्हणणे आहे. 

जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीची सभा गुरुवारी सभापती विजयराज डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. झेडपीचा मार्चअखेर अद्यापही संपलेला नाही. दलित वस्ती योजनेचे १८ कोटी रुपये परत जाणार असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने नुकतेच प्रकाशित केले होते. त्याचे पडसाद या बैठकीतही उमटले. खातेप्रमुखांकडील खर्चाची आकडेवारी आणि अर्थ विभागाने सादर केलेल्या आकडेवारीत तफावत दिसली. त्यावरुन अ‍ॅड़  सचिन देशमुख, भारत शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली.

तुम्ही प्रथम तुमचे हिशेब पूर्ण करा आणि मगच बैठकीला या, असे देशमुख यांनी सुनावले. कृषी विभागाचा एकूण खर्च ४० टक्के तर पशुसंवर्धन विभागाचा खर्च ४५ टक्के झाला आहे. समाजकल्याण व अपंग कल्याण विभागाच्या कारभारावर यंदा खूपच टीका झाली. या विभागात ४० टक्के खर्च झाला आहे. समाजकल्याण सभापती शीला शिवशरण यांनी अखर्चित प्रकरणाला तत्कालीन अधिकाºयांनाच जबाबदार धरले आहे. जिल्हा वार्षिक योजना आणि शासन योजना (हस्तांतर) यातील ३३ कोटी ४८ लाख शासनाला परत करावे लागणार असल्याचे अर्थ विभागातून सांगण्यात आले. 

सर्वच विभागांचा निधी वेळवर खर्च व्हावा यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे  आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी बैठका घेतल्या होत्या. डॉ. भारुड यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांना आढावा घेण्यासाठी तालुकास्तरावर पाठविले होते. पण यंत्रणेने फायलींचे घोळ कायम ठेवले. या अखर्चित निधीवरुनही सर्वसाधारण सभेत गोंधळ होण्याची चिन्हे आहेत. 

ग्रामपंचायत, कृषी यासारख्या विभागांनाही व्यवस्थित खर्च करता आलेला नाही. व्यक्तिगत लाभाच्या योजनेत सर्व विभागांचा सरासरी २५ टक्के खर्च झालेला दिसतो. ही नामुष्की आहे. समाजकल्याण विभागाचे १७.५० कोटी रुपये शासनाला परत जाणे ही फार वाईट गोष्ट आहे. असे काही झालेच नाही, असे अधिकाºयांचे म्हणणे होते. गोरगरीब दलितांसाठी शासनाने दिलेला निधी परत जात असेल तर अधिकाºयांवर कारवाई झालीच पाहिजे. - अ‍ॅड़  सचिन देशमुख, सदस्य, अर्थ समिती.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद