शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

एस-टी बस न थांबविल्याने सोलापूरच्या पोलिसाने चालकाला मारहाण करून एसटीच्या काचा फोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 19:00 IST

एसटी बस न थांबविल्याचा राग एका पोलीसाला न आवरल्याने त्याने चक्क एसटी चालकाच्या श्रीमुखात लगावली़ तो एवढ्यावरच न थांबता दगडाने एसटीची काच फोडून अडीच हजार रूपयांचे एसटीचे नुकसान केले़

आॅनलाइन लोकमत सोलापूरमंगळवेढा दि १५ : एसटी बस न थांबविल्याचा राग एका पोलीसाला न आवरल्याने त्याने चक्क एसटी चालकाच्या श्रीमुखात लगावली़ तो एवढ्यावरच न थांबता दगडाने एसटीची काच फोडून अडीच हजार रूपयांचे एसटीचे नुकसान केले़ हा प्रकार रड्डे ते भोसे मार्गावर १४ रोजी सकाळी ९़३० वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी चालकाने पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस शिपाई विजय सांगोलकर (रा. रड्डे) याच्याविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. सांगोला आगाराची एसटी बस (एम.एच़ १४ बी. टी़ ३५१४) ही रड्डे येथे आली होती. ती सांगोल्याकडे जात असताना १४ रोजी सकाळी ९़३०च्या सुमारास पोलीस शिपाई विजय सांगोलकर हे कुटुंबासमवेत सांगोल्याला जाण्यासाठी थांबले होते. बसचालकाने बस उभी न केल्याचा राग न आवरल्याने मोटारसायकलवर एसटीचा पाठलाग करून बस रस्त्यात थांबविली़ त्यानंतर एसटी चालक दत्तात्रय दगडू केदार (रा. वासुद अकोला, ता. सांगोला) यांच्या श्रीमुखात लगावली़ त्यानंतर दगडाने चालकाच्या दरवाजाजवळील काच फोडली़ यात  एसटी महामंडळाचे अडीच हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे चालकाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. घटनेनंतर एसटी चालकाने बसमधील प्रवासी दुसºया बसने सांगोल्याकडे पाठविले़ ती बस मंगळवेढा पोलीस स्टेशन आवारात आणून लावली आहे.