शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

भुकटी दरवाढीमुळे राज्यातील दूध अनुदान योजना गुंडाळली ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 14:42 IST

सोलापूर :   दूध भुकटीच्या दरात वाढ झाल्यामुळे झाल्यामुळे राज्य सरकार दुधाला प्रतिलिटर पाच रूपये अनुदान देण्याची योजना गुंडाळण्याच्या ...

ठळक मुद्देसव्वातीन महिन्यांचे अनुदान अडकलेअनुदान योजनेच्या प्रस्तावाला अर्थ खात्याची मंजुरी मिळेनादुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी तसा प्रस्ताव असल्याचे सांगितले. 

सोलापूर:  दूध भुकटीच्या दरात वाढ झाल्यामुळे झाल्यामुळे राज्य सरकार दुधाला प्रतिलिटर पाच रूपये अनुदान देण्याची योजना गुंडाळण्याच्या तयारीत असून, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी तसा प्रस्ताव तयार केला असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात गाईच्या दुधाच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी अडचणीत आला. ही बाब लक्षात घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यासाठी आंदोलन केल्यानंतर शासनाने अनुदान देण्याचे जाहीर केले. १ आॅगस्ट २०१८ पासून गाईच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले. हे अनुदान तीन (आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर)  महिन्यासाठी दिले जाणार होते. केवळ भुकटीसाठी वापरल्या जाणाºया अतिरिक्त दुधालाच हे अनुदान दिले जात आहे.  तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतरही दूध भुकटीचे दर सुधारले नसल्याने दुधाच्या दरात वाढ झाली नाही. त्यामुळे पशुसंवर्धन व दुग्ध विकास खात्याने अनुदानासाठी तीन (नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी) महिन्याची मुदतवाढ दिली. 

आॅगस्ट ते आॅक्टोबर या तीन  महिन्यांचेही संपूर्ण अनुदान अद्याप शेतकºयांपर्यंत पोहोचले नाही. दर महिन्याला साधारण ९० कोटी रुपये अनुदानासाठी द्यावे लागतात. तीन महिन्याचे (आॅगस्ट ते आॅक्टोबर) साधारण २७० ते २८० कोटी रुपये देय होते. त्यापैकी २५० कोटी रुपये दिले असल्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले. 

नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्याच्या अनुदान वितरणासाठी अर्थ खात्याची मान्यता आवश्यक आहे; मात्र दुग्धविकास खात्याच्या अनुदान मागणीला अर्थखात्याने अद्याप मान्यताच दिली नसल्याचे सांगण्यात आले. असे असताना दूध भुकटीच्या दरात वाढ झाली असल्याने अनुदानच बंद करण्याचा विचार राज्य शासन करीत आहे. याबाबत दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी तसा प्रस्ताव असल्याचे सांगितले. 

२५आॅक्टोबरपर्यंतचे अनुदान मिळाले आहे. राज्यभरातील शेतकºयांचे शासनाकडे अनुदानाचे ४०० कोटी रुपये अडकले आहेत.  ही मोठी रक्कम शासनाने लवकर द्यावी. दूध पावडरीच्या दरात ४० ते ५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे दिले जाणारे  प्रतिलिटर पाच रुपये मिळणार की बंद होणार हे माहीत नाही.-दशरथ मानेअध्यक्ष, महाराष्टÑ मिल्क असोसिएशन

दूध पावडरीचे दर कमी झाल्याने पावडरीसाठीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान दिले जात आहे.  बाजारात पावडरीचे दर १४० वरुन १९० रुपयांपर्यंत वाढले आहेत. अनुदान योजनेची सहा महिन्यांची मुदत संपल्याने आता अनुदान योजना बंद करण्याचा विचार आहे. तसा  प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाईल.- महादेव जानकरपशुसंर्धन व दुग्धविकास मंत्री 

टॅग्स :SolapurसोलापूरmilkदूधMahadev Jankarमहादेव जानकरgovernment schemeसरकारी योजना