शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांच्या हंगामाने सोलापुरात विविधरंगी जॅकेटच्या खरेदीची चलती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 09:28 IST

रेडिमेडला प्राधान्य, शिऊन घेण्यालाही पसंती: चेरी, बदामी, निळ्या रंगाला सर्वाधिक मागणी

ठळक मुद्देनिवडणुकांच्या हंगामाने दिली कपडे शौकिनांना संधी..लोकसभा निवडणुकीनिमित्त प्रत्येक गावात, वॉर्डातील नेतेमंडळींचा उत्साह तर वाढलाच आहेसोलापूर लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी प्रचार सुरू केला

संतोष आचलारे सोलापूर : लोकसभा निवडणुकीनिमित्त प्रत्येक गावात, वॉर्डातील नेतेमंडळींचा उत्साह तर वाढलाच आहे; पण कपडे शौकिनही आता निवडणुकीच्या हंगाम सुरू असल्याची संधी घेत जॅकेट खरेदी करीत आहेत.  चेरी, बदामी व निळ्या रंगाच्या जॅकेट खरेदीला कार्यकर्त्यांची अधिक पसंती मिळत असल्याची माहिती जॅकेट विक्रेत्यांनी दिली. जॅकेटसाठी खादी कापड घेऊन ते शिऊन घेण्यात वेळ घालविण्यापेक्षा रेडिमेड चार ते पाच हजार रुपयांतील खादी जॅकेट खरेदीकडे पसंती मिळत आहे.

सोलापूर लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावातील व शहरातील वॉर्डातील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाºयांच्या भेटीगाठी घेणे उमेदवारांकडून सुरु आहे. उमेदवारासमोर आपली छाप पडावी यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते पारंपरिक पांढरी असणारी वेशभूषा बदलून पांढºया वेशभूषेला  जॅकेटचा आधार देताना दिसून येत आहेत.

दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही जॅकेट घालण्याची आवड होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॅकेटची क्रेझ वाढविली. अलीकडच्या पाच वर्षांत जॅकेट घालण्याची परंपराच निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या काळात आपली वेगळी छाप मतदारांवर पडावी यासाठी नेतेमंडळींसह पदाधिकारी व कार्यकर्तेही जॅकेट घालत आहेत. 

सोलापुरात रेडिमेड जॅकेट विक्री सध्या जोमात होत आहे. साधारणपणे पाच हजार रुपये किमतीच्या जॅकेट खरेदीकडे कल दिसून येत आहे. यात विविध प्रकारचे रंग निवडण्याचा पर्याय आहे. काही कार्यकर्ते सातशे ते नऊशे रुपये मीटरप्रमाणे जॅकेटसाठी कापड खरेदी करीत आहेत. जॅकेट शिऊन देणाºया टेलरची संख्याही वाढली आहे. यासाठी बाराशे ते दीड हजार रुपये शिलाई दर घेण्यात येत आहे.

जॅकेटचा वापर सर्वत्र : चेतन गंगनहळ्ळी

  • - सोलापुरात काही दिवसात जॅकेट खरेदी करणाºया ग्राहकांची संख्या वाढली आहे. शुभकार्य व निवडणुका अशाप्रसंगी वापरता येणाºया जॅकेट खरेदीला ग्राहकांची पसंती दिसून येत आहे. रंगीत व खादी असणाºया पाच हजार रुपयांपर्यंतच्या जॅकेटलाही प्राधान्य मिळत असल्याची माहिती व्यावसायिक चेतन गंगनहळ्ळी यांनी दिली. 

रंग निवडण्यासाठी भरपूर पर्याय

  • - जॅकेटसाठी खादी कापड घेऊन ते शिऊन घेण्याकडे कल काही ग्राहकांचा आहे. विविध रंगाचे कापड जॅकेटसाठी उपलब्ध होत असल्याने ग्राहकांसमोर रंगांमध्ये भरपूर पर्याय असल्याची माहिती पार्क चौकातील खादी कापड दुकानदारांनी दिली.
  • लाईट कलरलाही मिळतेय पसंती 

-निळा, चेरी, हिरवा, काळ्या यासारख्या रंगांतील जॅकेट शिऊन घेण्याचा कल ग्राहकांचा आतापर्यंत होता. मात्र काही महिन्यांपासून लाईट कलरमधील खादी कापड आणून जॅकेट शिऊन घेण्याचा कल दिसून येत असल्याची माहिती जॅकेट शिवणारे टेलर संजय सुलाखे यांनी दिली. 

टॅग्स :Solapurसोलापूरsolapur-pcसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक