शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांचा पगार लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 14:45 IST

सोलापूर जिल्हा परिषद : जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा आरोप

ठळक मुद्देतालुकास्तरावरुन शिक्षकांच्या वेतन मागण्या उशिरा एका तालुक्यातून गट विम्याची मागणीही चुकीचीशनिवार किंवा सोमवारपर्यंत शिक्षकांचा पगार होईल - शिक्षणाधिकारी

सोलापूर :  जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा पगार लांबणीवर पडत असल्याचा आरोप जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवानंद भरले यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी झेडपी अध्यक्ष संजय शिंदे, सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांना निवेदन दिले आहे. 

भरले यांनी निवेदनात म्हटले आहे, सध्या शासनाची शालार्थ वेतन प्रणाली बंद पडली आहे. गेली चार महिने आॅफलाईन पद्धतीनेच पगार काढला जात आहे. आॅफलाईन पगार काढण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाच्या हाती आहे. गेल्या चार महिन्यांपासून २० तारखेच्या आत कधीच पगार झालेला नाही. त्यामुळे रुग्ण शिक्षकांचे अतोनात हाल होत आहेत. शिवाय शिक्षकांच्या घरबांधणी कर्जाचे हप्ते तटल्याने त्यांना दंड सोसावा लागत आहे. शिक्षकांच्या पगार लांबणीवर पडण्यास कारणीभूत असणाºया कर्मचाºयांवर कारवाई करण्यात यावी. यावेळी वीरभद्र यादवाड, सूर्यकांत हत्तुरे, रेवणसिद्ध हत्तुरे आदी उपस्थित होते.

बदल्यांच्या कामामुळे तालुकास्तरावरुन शिक्षकांच्या वेतन मागण्या उशिरा आल्या. एका तालुक्यातून गट विम्याची मागणीही चुकीची आली. ती दुरुस्त करण्यास वेळ लागला. उद्यापर्यंत सर्व प्रकारच्या त्रुटी दूर होतील आणि शनिवार किंवा सोमवारपर्यंत शिक्षकांचा पगार होईल. -संजयकुमार राठोड, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदSchoolशाळा