शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

दर घसरल्याने दूध उत्पादकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 13:12 IST

सरकारची बघ्याची भूमिका, ऐन उन्हाळ्यात गाईच्या दुधाला मिळतो १८ रुपयांचा दर 

ठळक मुद्देघसरणाºया दरामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत मार्चनंतर दूध संकलनात मोठी घटमागील वर्षी जून महिन्यापासून दूध खरेदी दरात वरचेवर घसरण

सोलापूर: आतापर्यंत जानेवारीनंतर उन्हाळ्यात दूध खरेदीचे दर वाढत असत; मात्र यावर्षी एप्रिल महिन्यात दुधाचे दर आणखीन घसरुन १८ रुपयांवर आले आहेत. घसरणाºया दरामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला असताना सरकार बघ्याची भूमिका घेत आहे.

आॅक्टोबरनंतर दूध संकलनात वाढ होते. जानेवारी अखेरपर्यंत दूध वाढीचा कालावधी असतो. फेब्रुवारीपासून दूध संकलन हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते. मार्चनंतर दूध संकलनात मोठी घट होते. त्यामुळे मार्चनंतर दूध खरेदी दरात वाढ होण्यास सुरुवात होते. एप्रिल-मे- जून महिन्यात दूध खरेदी दर वाढल्याने शेतकºयांना चार पैसे मिळतात; मात्र यावर्षी मागील वर्षी जून महिन्यापासून दूध खरेदी दरात वरचेवर घसरण होत आहे.

जून महिन्यात खासगी दूध संकलन डेअºया गाईच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपयांचा दर देत होत्या. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी याच महिन्यात गाईच्या दुधाला प्रतिलिटर २७ रुपये दर जाहीर केला. राज्यात खासगी दूध डेअºयांच्या ताब्यात दूध धंदा गेला आहे. जानकरांनी केलेली दूध खरेदी दरवाढ खासगी संघांनी मान्य केली नाही. त्यानंतर वरचेवर दूध खरेदी दर कमी करीत एप्रिल महिन्यात १८ रुपयांवर दर आले. राज्यात विशेषत: पश्चिम महाराष्टÑात दूध संकलन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाल्याने दुधाचे दर घसरत असल्याचे सांगितले जाते.

गतवर्षी होता २७ रुपये दरसोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे मागील १० वर्षांतील एप्रिल महिन्यातील गाईच्या दुधाचे खरेदी दर कमी अधिक झाले असले तरी यावर्षी दरात मोठी घसरण झाली आहे. २००८ मध्ये ११ रुपये २५ पैसे. २००९ मध्ये १० रुपये ५० पैसे. २०१० मध्ये १४ रुपये. २०११ मध्ये १६ रुपये, २०१२ मध्ये १७ रुपये. २०१३ मध्ये १७ रुपये., २०१४ मध्ये २४ रुपये., २०१५ मध्ये १८ रुपये., २०१६ मध्ये २० रुपये. २०१७ मध्ये २७ रुपये व २०१८ मध्ये १८ रुपये. 

तर दर घसरतीलच..- दरवर्षी जानेवारीनंतर दुधाचे दर वाढत असतात. याप्रमाणे याहीवर्षी दर वाढतील या अपेक्षेने शेतकरी दर वाढीकडे डोळे लावून जनावरांचे संगोपन करीत आहेत; मात्र वरचेवर दुधाचे दर कमी-कमी होत आहेत. या व पुढील मे महिन्यातही शासनाने लक्ष दिले नाही तर दर घसरतील असे सांगितले जाते. 

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीmilkदूध