आॅनलाइन लोकमत सोलापूरमंद्रुप दि १ : कुसूर येथे भीमा नदीत वाळू उपशामुळे पडलेल्या खड्ड्यात कपडे धुताना पाय घसरून पडल्याने एका महिलेचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजता घडली.शारदा राजकुमार हेरकर (वय ३५, रा. कुसूर) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. मंद्रुप पोलिसात याची नोंद झाली आहे. याची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत शारदा हेरकर या सकाळी कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या. नदीला भरपूर पाणी असल्याने इतर महिलांसोबत त्या कपडे धुवत होत्या. शारदा कपडे धुवत असलेल्या ठिकाणी वाळू उपशामुळे मोठा खड्डा पडला आहे. त्याचा त्यांना अंदाज आला नाही. पाय घसरल्याने त्या खड्ड्यात पडल्या. त्या बुडू लागताच इतर महिलांनी आरडाओरड केली. गावातून तरुण धावत घटनास्थळी आले, तोपर्यंत त्या बुडाल्या होत्या. त्यानंतर काही तरुणांनी पाण्यात उतरून शारदा यांचा मृतदेह बाहेर काढला.या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक अजित त्रिपुटे, हवालदार बापू दुधे यांनी मृतदेह मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला. तेथे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.--------------------कुटुंबाचा आधार गेला...मयत शारदा यांचे कुसूरच्या बसस्थानकावर छोटे दुकान होते. शेती नसल्याने या दुकानावर घर चालायचे. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने हेरकर कुटुंबाचा आधारच हरपला आहे. त्यांच्या पश्चात पती, सासू व दोन मुले असा परिवार आहे.
कुसूरमध्ये भीमा नदीत बुडून महिलेचा मृत्यू, कपडे धुताना पाय घसरून झाला अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 17:18 IST
कुसूर येथे भीमा नदीत वाळू उपशामुळे पडलेल्या खड्ड्यात कपडे धुताना पाय घसरून पडल्याने एका महिलेचा बुडून मृत्यू झाला.
कुसूरमध्ये भीमा नदीत बुडून महिलेचा मृत्यू, कपडे धुताना पाय घसरून झाला अंत
ठळक मुद्देया घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक अजित त्रिपुटे, हवालदार बापू दुधे यांनी मृतदेह मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवलाशारदा राजकुमार हेरकर (वय ३५, रा. कुसूर) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या महिलेचे नाव