शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीमुळे सोलापुरातील १० कोटींच्या टॉवेल्सची निर्यात होणार ठप्प...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 11:02 IST

यंत्रमागाला फटका; अनलॉकनंतर आॅर्डर्स मिळू लागल्या; पण आता काम थांबवावे लागणार

ठळक मुद्देलॉकडाऊन पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे सर्वच क्षेत्रातील व्यापारी पेठा, दुकाने शंभर टक्के पूर्वपदावर आली नाहीतआपसूकच देशांतर्गत तसेच विदेशी मार्केटमधून सोलापुरी टेक्स्टाईल उत्पादनांना पूर्वीप्रमाणे उठाव नाहीसोलापुरातील टेक्स्टाईल उद्योग शंभर टक्के पूर्वपदावर यायला आणखीन वेळ लागेल

सोलापूर : सोलापुरात १६ जुलैपासून दहा दिवसांची संचारबंदी लागू केल्यामुळे निम्म्या क्षमतेनेच का होईना; पण सुरू असलेला यंत्रमाग उद्योग आता बंद राहणार आहे. त्यामुळे विदेशातून मिळालेल्या दहा कोटी रुपयांच्या आॅर्डर्सनुसार उत्पादित केलेल्या टॉवेल्सची निर्यात ठप्प झाली आहे. 

साडेतीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर अनलॉक झाले अन् यंत्रमाग उद्योग काहीअंशी सुरू झाला. अलीकडील काळात आखाती देश, युरोप, श्रीलंका आदी देशातून टॉवेल्सच्या आॅर्डर्स मिळू लागल्या. आजमितीस उद्योजकांच्या हातात १० कोटी रुपयांच्या आॅर्डर्स होत्या; पण संचारबंदीत शहरातील उद्योग बंद ठेवण्याचा आदेश असल्यामुळे हे काम पूर्ण करणे यंत्रमागधारकांना अशक्य होणार आहे.सध्या फक्त चाळीस टक्केच उत्पादन सुरू आहे. कारखान्यातील कामाच्या वेळेत प्रचंड कपात केली आहे. काही उद्योजकांनी चार किंवा पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला आहे. यामुळे टेक्स्टाईलमधील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. कामगारांना पूर्ण क्षमतेने रोजगार मिळेना.

सोलापुरात जवळपास ८०० कारखानदार कार्यरत आहेत. जवळपास १३ हजार यंत्रमाग असून यातील फक्त आठ हजार यंत्रमाग सध्या सुरू आहेत. या उद्योगावर ४०  हजार कामगार अवलंबून आहेत. यातील ६० टक्के कामगारांना सध्या पूर्ण क्षमतेने रोजगार मिळू लागला आहे. सोलापुरातील बहुतांशी कारखानदार विदेशी मार्केटवर देखील अवलंबून आहेत. येथील एक्सपोर्ट मार्केट खूप मोठा आहे. पण अलीकडच्या काळात एक्सपोर्ट व्यवसाय खूप कमी होऊ लागला. त्यात लॉकडाऊनचा जबरदस्त फटका एक्स्पोर्ट  करणाºया टेक्स्टाईल उद्योजकांना बसला आहे. भविष्यात एक्स्पोर्ट व्यवसाय पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू होईल का ? याची शाश्वती नसल्याने बडे उद्योजक चिंताग्रस्त आहेत.

सर्वाधिक फटका कामगारांनालॉकडाऊन पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे सर्वच क्षेत्रातील व्यापारी पेठा, दुकाने शंभर टक्के पूर्वपदावर आली नाहीत. त्यामुळे आपसूकच देशांतर्गत तसेच विदेशी मार्केटमधून सोलापुरी टेक्स्टाईल उत्पादनांना पूर्वीप्रमाणे उठाव नाही. ज्या आॅर्डर स्वीकारल्या आहेत त्यांनाही आता पुरवठा करता येणार नाही. सर्वात मोठा उद्योग म्हणून टेक्स्टाईल उद्योगाची ओळख आहे. त्यामुळे सोलापुरातील टेक्स्टाईल उद्योग शंभर टक्के पूर्वपदावर यायला आणखीन वेळ लागेल. मार्केटचा अंदाज घेत उत्पादन घेत रहावे. पुढील काळात चांगले मार्केट निर्माण होईल. पुन्हा दहा दिवस संचारबंदी लागू झाल्याने यंत्रमागधारकांसोबत सर्वाधिक फटका कामगारांना बसणार आहे.- पेंटप्पा गड्डम, अध्यक्ष : सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघ, सोलापूर 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याTextile Industryवस्त्रोद्योग