शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

कोरोनामुळे यंदाही आषाढी वारी प्रतीकात्मक स्वरूपातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 06:05 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परंपरा कायम ठेवून पालखी सोहळ्याचे नियोजन

ठळक मुद्देआषाढी वारी नियोजनाबाबत सांस्कृतिक भवन प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ढोले म्हणाले, आषाढी वारी ही कोरोनाच्या संकटकाळात पार पडत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पंढरपूर (जि. सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी संप्रदायाची परंपरा कायम ठेवून पालखी सोहळ्याचे नियोजन केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी आषाढी वारी प्रतीकात्मक स्वरूपात करण्यात येणार आहे.  ज्या पालखी सोहळ्यांना शासनाने परवानगी दिली आहे, ते पालखी सोहळे बसने पंढरपुरात दाखल होतील. इतर कोणत्याही पालखी, दिंडी तसेच वारकरी व भाविकांनी आषाढी वारी कालावधीत पंढरपुरात येऊ नये,  असे आवाहन  प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले.

आषाढी वारी नियोजनाबाबत सांस्कृतिक भवन प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ढोले म्हणाले, आषाढी वारी ही कोरोनाच्या संकटकाळात पार पडत आहे.  कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पालखी सोहळ्याबात  शासन स्तरावर निर्णय घेण्यात आलेला असून, वारी प्रतीकात्मक स्वरूपात पार पाडण्यासाठी देण्यात आलेली जबाबदारी समन्वयाने पार पाडावी. 

पायी वारीसाठी भजन आंदोलनnसोलापूर/मुंबई : शासन निर्णयात बदल करून आषाढी वारीमध्ये पारंपरिक दिंडी व पालखी घेऊन येण्यासाठी किमान ५० भाविकांना अटी व नियम घालून परवानगी द्यावी, आषाढी पायी वारीला परवानगी द्यावी, या मागणीसाठी अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने मुंबईत आझाद मैदानावर भजन आंदोलन करण्यात येत आहे. nआषाढी वारीत वारकऱ्यांना पायी वारीत सहभागी होण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज, राष्ट्रीय सचिव बळीराम जांभळे, जिल्हाध्यक्ष जोतिराम चांगभले, शहराध्यक्ष संजय पवार, गोविंद ताटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :PandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारी