शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे २० टक्के रुग्ण चाळिशीच्या आतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 12:29 IST

जागतिक हृदय दिन : बदलती जीवनशैली कारणीभूत, तणाव अन् फास्टफूडही धोकादायक

ठळक मुद्देसोलापूर शहरात प्रदूषण व धूळ जास्त आहे. याचा थेट संबंध हृदयरोगाशी येत नाही फुप्फुसाचे आजार असल्याने त्याचा ताण हा हृदयावर पडतोकामाच्या बदललेल्या वेळामुळे तसेच आठ तासांपेक्षा अधिक काम केल्याने शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात

सोलापूर : हृदयविकाराच्या आजाराला चाळीस वर्षांपुढील लोक बळी पडतात, हा समज आता खोटा ठरत आहे. या आजाराच्या एकूण रुग्णांपैकी २० टक्के रुग्ण हे चाळिशीच्या आतील आहेत. २० वर्षांपूर्वी हे प्रमाण फक्त दोन टक्के होते. यात आता वाढ झाली आहे.

चाळिशीच्या आत हृदयविकार होणे याचे प्रमुख कारण म्हणजे बदलती जीवनशैली, खाण्याच्या पद्धतीत बदल, फास्ट फूड, तणाव ही आहेत. मधुमेह आणि रक्तदाबाचा आजार असणाºया रुग्णाला हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते. कामाचा ताण वाढल्यामुळे तरुणाई मोबाईल, लॅपटॉपशिवाय राहू शकत नाही. कामाव्यतिरिक्त स्वत:ला वेळ देणे महत्त्वाचे आहे. तणाव कमी करण्यासाठी आपल्या आवडीच्या क्षेत्र किंवा कलेला वेळ देऊन त्यातून आनंद घ्यायला हवा. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप हे देखील महत्त्वाचे आहे. पुरेशी झोप घेतल्यास थकलेल्या शरीराला आराम मिळतो. शरीर पुन्हा काम करण्यास सज्ज होते. कामाच्या बदललेल्या वेळामुळे तसेच आठ तासांपेक्षा अधिक काम केल्याने शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात.

सोलापूर शहरात प्रदूषण व धूळ जास्त आहे. याचा थेट संबंध हृदयरोगाशी येत नाही, तरी देखील या वातावरणामुळे अस्थमा किंवा फुफ्फुसासंबंधी आजार उद्भवू शकतात. फुप्फुसाचे आजार असल्याने त्याचा ताण हा हृदयावर पडतो. यामुळे हृदयविकाराचा झटका येत नसला तरी हृदयासंबंधी इतर आजार होऊ शकतात.--------प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीची गरजयेत्या १० ते १५ वर्षांमध्ये हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना पाहण्यापेक्षा हा आजार होऊ नये, यावर काम करणाºया डॉक्टरांची संख्या वाढेल. याला प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी असे म्हणतात. काही पाश्चिमात्य देशात सध्या अशा पद्धतीचे उपचार मोठ्या प्रमाणात होत आहेत. भारतात हृदयविकाराचे रुग्ण वाढत असल्याने भविष्यात भारतातही ही उपचार पद्धती वाढण्याची शक्यता आहे. प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये हृदयविकार होऊ नये, यासाठी सल्ला देणे, उपचार करणे आदी बाबी येतात.

हृदयविकाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. याबाबत अधिक जागृती करण्याची गरज आहे. हृदयविकार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा हा आजार होऊ नये, यासाठी प्रयत्न करायला हवेत. यासाठी जीवनशैलीत चांगले बदल, व्यायाम, योग्य पद्धतीचा आहार घेणे गरजेचे आहे.- डॉ. अमजद सय्यद,हृदयरोगतज्ज्ञ 

टॅग्स :SolapurसोलापूरHeart DiseaseहृदयरोगHealthआरोग्य