शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

सोलापूर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना ड्रेसकोड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 11:47 IST

शिक्षण समितीत चर्चा : संगणक, कपाट मागणीचे भरमसाट प्रस्ताव; १००० शाळांसाठी प्रोजेक्टरची मागणी

ठळक मुद्देशिक्षकांना ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय सभेने घेतला ड्रेसचा रंग व खर्चाबाबत अधिकृत शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा १००० शाळांसाठी संगणक, प्रोजेक्टर मिळण्याची मागणी

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय सभेने घेतला आहे, त्यामुळे याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. फक्त ड्रेसचा रंग व खर्चाबाबत अधिकृत शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण व आरोग्य सभापती शिवानंद पाटील यांनी दिली. 

शिक्षण व आरोग्य समितीची बैठक सभापती शिवानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  झाली. बैठकीला शिक्षण समितीचे सदस्य रणजितसिंह शिंदे, गोविंद जरे, संजय गायकवाड, स्वाती कांबळे व अधिकारी उपस्थित होते. बैठकीत प्राथ. व माध्य.च्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. बºयाच झेडपी शाळांनी संगणक व प्लास्टिक कपाटाची मागणी केली. एनटीपीसीच्या २०१८-१९ च्या सीएसआर फंडातून १००० शाळांसाठी संगणक, प्रोजेक्टर मिळण्याची मागणी केली. जिल्हाधिकाºयांनी हा प्रस्ताव एनटीपीसीला दिल्याचे सांगण्यात आले. शाळांना फायबर कपाट देण्याचे अनेक प्रस्ताव आले परंतु इतके प्रस्ताव मंजूर करणे अवघड आहे. पहिल्या   टप्प्यात केंद्रशाळांना कपाट देण्यात येणार आहे. 

जिल्ह्यातील प्रत्येक गटशिक्षण अधिकाºयांनी तालुक्यातील एक आदर्श शाळा तयार करावी असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांची संख्यावाढ, डिजिटल शाळा, परिसर स्वच्छता आदी उपक्रम राबविण्याची जबाबदारी राहणार आहे. या शाळांच्या सुधारणेसाठी जिल्हा नियोजन समितीकडून १ कोटी २0 लाखांची मागणी करण्यात येणार असून, प्रत्येक तालुक्यातील एका शाळेत दहा लाख देण्याचे नियोजन आहे. शाळा दुरुस्तीसाठी १२ कोटी १५ लाखांचे प्रस्ताव आले आहेत. पण समितीकडे केवळ दीड कोटीचा निधी उपलब्ध आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदTeacherशिक्षक