शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

डॉ. मृणालिनी फडणवीस यांची सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्त‍ी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 18:09 IST

महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ (श्रीमती) मृणालिनी मिलिंद फडणवीस यांची सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सोलापूर- नागपूर महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ (श्रीमती) मृणालिनी मिलिंद फडणवीस यांची सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी गुरुवारी ( ३) डॉ. फडणवीस यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले.  डॉ मृणालिनी फडणवीस यांची नियुक्ती कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी किंवा त्या वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील तोपर्यंत (यापैकी जे अगोदर असेल ते) करण्यात आली आहे. डॉ एन. एन. मालदार यांचा कुलगुरूपदाचा कार्यकाळ दिनांक १० डिसेंबर २०१७ रोजी संपल्यापासून हे पद रिक्त झाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ  नितीन करमळकर हे सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते. डॉ मृणालिनी फडणवीस यांनी डॉ. हरिसिंग गौर विद्यापीठ, सागर येथून अर्थशास्त्र तसेच एकॉनोमेट्रिक्स या विषयांत एम.ए. तसेच पीएच.डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायाधीश पी. वेंकटरामा रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. प्रो. शंतनू चौधरी, संचालक, सेन्ट्रल इलेक्ट्रोनिक्स इंजिनीअरिंग रिसर्च इंस्टीट्युट, (सीरी) पिलानी, राजस्थान व मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी समितीचे सदस्य होते.