श्रीरंग पालकर कुटुंबाकडून माढा महाविद्यालयास लाखांची देणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:21 AM2021-01-21T04:21:14+5:302021-01-21T04:21:14+5:30

माढा : सन्मती पतसंस्थेचे सचिव श्रीरंग पालकर यांच्या वतीने रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयास एक लाख रुपयांची ...

Donation of lakhs to Madha College from Srirang Palkar family | श्रीरंग पालकर कुटुंबाकडून माढा महाविद्यालयास लाखांची देणगी

श्रीरंग पालकर कुटुंबाकडून माढा महाविद्यालयास लाखांची देणगी

Next

माढा : सन्मती पतसंस्थेचे सचिव श्रीरंग पालकर यांच्या वतीने रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयास एक लाख रुपयांची देणगी देण्यात आली. तसेच रयत शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त स्व. डाॅ. मोहन जाधव यांचे चिरंजीव विश्वजित जाधव यांनीही महाविद्यालयास दहा हजार रुपयांची देणगी दिली.

संगणक कक्ष, स्वतंत्र अभ्यासिका, ग्रंथालय नूतनीकरण, कौशल्यावर आधारित विविध कोर्सेस, पोलीस प्रशिक्षण केंद्र, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अशी अनेक कामे पूर्ण करण्याचा मानस प्राचार्य सुरेश ढेरे यांनी व्यक्त केला.

यावेळी श्रीरंग पालकर, प्रा. अशोक कदम, प्रा. मधुकर अनंतकवळस, प्रा. अशोक लोंढे, प्रा. पालकर, प्रा. घाडगे, प्रा. राऊत, प्रा. कदम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

.........

फोटो : २० श्रीरंग पालकर

श्रीरंग पालकर यांच्याकडून माढा महाविद्यालयास देणगी देताना प्राचार्य सुरेश ढेरे. याप्रसंगी प्रा. अशोक लोंढे, प्रा. जयवंत पालकर, प्रा. सतीश घाडगे उपस्थित होते.

Web Title: Donation of lakhs to Madha College from Srirang Palkar family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.