दुधनीत मटका अड्ड्यावर धाड; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 01:19 PM2017-08-23T13:19:27+5:302017-08-23T13:22:26+5:30

सोलापूर दि २३ : जिल्ह्यात मटकाबुकींच्या विरोधात उघडलेल्या धडक मोहिमेत  सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने दुधनी येथे मटका अड्ड्यावर धाड टाकून ३ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी १६ जणांना अटक करण्यात आली.

Dodaighata stack; Three hundred and fifty lakhs of money seized | दुधनीत मटका अड्ड्यावर धाड; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

दुधनीत मटका अड्ड्यावर धाड; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Next
ठळक मुद्देया प्रकरणी १६ जणांना अटक ३ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २३ : जिल्ह्यात मटकाबुकींच्या विरोधात उघडलेल्या धडक मोहिमेत  सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने दुधनी येथे मटका अड्ड्यावर धाड टाकून ३ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी १६ जणांना अटक करण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या आदेशान्वये अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करताना मंगळवारी दुपारी १ ते ४ या वेळेत दुधनी (ता. अक्कलकोट) येथील मटका अड्ड्यावर धाड टाकली. यात गुरुशांतलिंग मल्लिनाथ झळके, शरणबसप्पा सदानंदप्पा हरवाळ, विठ्ठल हणमंत जमादार, सिद्धाराम बसवराज बिल्लाड, महादेवप्पा जंबण्णा हुबळी, सय्यदचाँद हुसेनसाब चंदापूर महेश दौलतराव कण्णी, उदय सिद्राम मग्गी, गणपत बासू राठोड, निंगण्णा नागण्णा रुगी, अशोक शांतप्पा दंडवते, शिवकुमार गुंडप्पा भाईकट्टी, मल्लिनाथ शंकर निलू, कासीम इब्राहिम डफेदार, प्रशांत सिद्धण्णा कण्णी, प्रशांत बसवराज भैरामडगी (सर्व रा. दुधनी, ता. अक्कलकोट) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मटक्याचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण ३ लाख ६४ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता गुलाबसाब खैराट व अप्पू परमशेट्टी (दोघे रा. दुधनी) असे असल्याचे समजल्याने १८ जणांविरुद्ध अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Dodaighata stack; Three hundred and fifty lakhs of money seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.