शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांनाही घाम फुटला; दंश केलेला साप घेऊनच ‘ती’ चक्क रुग्णालयात अवतरली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 12:02 IST

बीबीदारफळमधील महिला शिंदेंचा धाडसी प्रयत्न; रात्रीच्या सुमारास पाणी देताना घडली घटना

ठळक मुद्देबालिका शिंदे यांनी सोबत साप आणल्याने डॉक्टरांना उपचार करणे सोयीचे झालेडॉक्टरांनी साप विषारी असल्याचे किमान पाच दिवस उपचारासाठी थांबावे लागेल, असे त्यांना सांगितलेन घाबरता त्यांनी उपचाराला साथ दिली आणि त्यांचे प्राण वाचले

अरुण बारसकर  सोलापूर: रात्रीच वीज सुरू होणार अन् पिकांना पाणी द्यावे लागणार म्हणून मोबाईलच्या उजेडात दार फोडले... बहिणीचा मोबाईल आल्याने बोलणे सुरू असताना पायाला सापाने दंश केला़़. काहीतरी चावल्याची त्यांना जाणीव झाली... मोबाईल बंद केला अन् बघते तर काय साप... मग काय?...त्यांनी धाडसाने साप धरला अन् सोबत घेऊन  चक्क शासकीय रुग्णालयात अवतरल्या... हे पाहून डॉक्टरांनाही घाम फुटला... मात्र, त्यांना औषधोपचार करणे सोयीचे झाले. 

त्या वाचलेल्या धाडसी महिलेचे नाव आहे बालिका अशोक शिंदे. तीन दिवसांपूर्वी बीबीदारफळ शिवारात ही घटना घडली. वीज पुरवठा कधी सुरू होणार अन् कधी बंद होणार हे सांगता येत नाही़ मात्र वीज सुरू झाल्यानंतर विद्युत मोटार सुरू करून पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. अशाच स्थितीत बीबीदारफळ येथील बालिका अशोक शिंदे (वय ४०) या महिला रात्री ९ वाजता वीज येणार असल्याने तिने पिकाला पाणी देण्यासाठी दार फोडले. इतक्यात बहिणीचा फोन आला अन् त्यांनी मोबाईल उचलला़ त्या बोलू लागल्या. यावेळी कांदा पिकात लपलेल्या सापाने पायाला दंश केला. आपल्याला काहीतरी चावले आहे, याची जाणीव झाली अन् त्यांनी खाली पाहिले तर चक्क साप. 

सापाने दंश केल्याचे लक्षात येताच त्यांनी त्या सापाला धाडसाने धरले़ त्याला सोबत घेतले. गावात उपचार करण्याचा प्रयत्न केला़  मात्र साप चावल्याने शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला मिळाला. त्यांनी थेट सोलापूर   शासकीय रुग्णालय गाठले. सोबत आणलेला साप पाहून डॉक्टरांनाही घाम फुटला. त्या सापाची पाहणी करून डॉक्टरांनी लागलीच त्यांच्यावर उपचार सुरू केले. 

बालिका शिंदे यांनी सोबत साप आणल्याने डॉक्टरांना उपचार करणे सोयीचे झाले व प्राणही वाचले. हा साप घोणस असल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांनी साप विषारी असल्याचे किमान पाच दिवस उपचारासाठी थांबावे लागेल, असे त्यांना सांगितले होते. न घाबरता त्यांनी उपचाराला साथ दिली आणि त्यांचे प्राण वाचले.

सलग तीन महिने रात्रीच वीज येते- बीबीदारफळ गावासाठी अकोलेकाटी व बीबीदारफळ उपकेंद्रातून वीज पुरवठा होतो. दोन्ही उपकेंद्रांतून डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी असे सलग तीन महिने शेतीपंपासाठी रात्रीच वीज पुरवठा केला जात आहे. ज्वारी, गहू, हरभरा, कांदा तसेच अन्य पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीचे जागरण करावे लागते. ऐन रब्बी पिकांचा कालावधी असताना एकाच गावाला सलग तीन महिने रात्रीचा वीज पुरवठा सुरू आहे.

मागील वर्षी पाणी नसल्याने पिके घेता आली नाहीत. यावर्षी पाणी आहे, मात्र वीज रात्री ८ ते सकाळी ६ वाजेदरम्यान असते. थंडी व अंधार असला तरी पिकांना पाणी दिल्याशिवाय पर्याय नाही. एकाच गावाला सलग तीन महिने रात्रीच वीज देण्याचे नियोजन कसले?- शिवाजी पाटील, अध्यक्ष, महात्मा गांधी तंटामुक्त समिती

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यWomenमहिला