शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरकडून नर्सवर रूग्णालयातच अत्याचार; नर्सचा पेटवून घेण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 14:30 IST

मंगळवेढ्यातील घटना; पिडित महिलेनी दिली तक्रार, डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल

ठळक मुद्देगंभीर भाजलेल्या स्थितीत पोलिसांनी तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलेदरम्यान, वेळोवेळी पीडितेवर अत्याचार केल्याने तिला दिवस गेले होतेकोणास काही सांगितल्यास तुला व तुइया घरातील लोकांना मारून टाकण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले

मंगळवेढा :  एका २७ वर्षीय नर्सवर अत्याचार केल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील एका डॉक्टरविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. दरम्यान, पीडित महिलेने गुरुवारी सकाळी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन जाळून घेण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे. प्रशांत प्रभाकर नकाते असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पीडित नर्सला एक वर्षापूर्वी डॉक्टरने तू मला खूप आवडतेस, मी तुइयावर प्रेम करतो, माझे लग्न झाले आहे. मी तुला आयुष्यभर सांभाळतो, असे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केले. ५ जून २०१९ ते २६ एप्रिल २०२० पर्यंत त्याने  पीडितेशी शारीरिक संबंध ठेवल्याचे दिलेल्या फियार्दीत म्हटले आहे.

याबाबत पीडिता पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी दोनवेळा गेली होती; मात्र चक्कर येत असल्याने पूर्ण तक्रार न देता परत आली. आई व भावाने तक्रार दिल्यास बदनामी होईल, असे सांगितल्याने तक्रार दिली गेली नाही. गुरुवारी ( १८ जून) रोजी सकाळी ११ वाजता पीडिता डॉक्टरला भेटण्यासाठी गेली होती. तिच्यावर अन्याय झाल्याची खंत असल्याने तिने सोबत पेट्रोल नेले होते. तेथेच तिने अंगावर ओतून पेटवून घेतले. अचानक घडलेल्या या प्रकाराने डॉक्टर व दवाखान्यातील अन्य मंडळींनी अंगावर पाणी टाकून विझवले.

गंभीर भाजलेल्या स्थितीत पोलिसांनी तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, वेळोवेळी पीडितेवर अत्याचार केल्याने तिला दिवस गेले होते. आरोपीने जबरदस्तीने गोळ्या देऊन गर्भपात केला आहे. कोणास काही सांगितल्यास तुला व तुइया घरातील लोकांना मारून टाकण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल