शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रग्रहण पाळू नका, वटपूजन करता येईल; सुतक पाळ्ण्याचीही गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 12:08 IST

पंचांगकर्ते मोहन दाते यांचे आवाहन; नेहमीप्रमाणे सर्व व्यवहार, पूजा, अर्चा, कुळधर्म, कुलाचार करावेत

ठळक मुद्दे५ जूनला असणारं चंद्रग्रहण तब्बल ३ तास १८ मिनिटांचं आहे५ जूनला रात्री ११.१५ मिनिटांनी सुरू होईल, ६ जूनला २.३४ मिनिटांनी ग्रहण संपेलएक उपछाया चंद्रग्रहण असल्यामुळे याचं सुतक पाळण्याची गरज नाही

सोलापूर : ज्येष्ठ पौर्णिमेस शुक्रवारी ५ जूनला चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण ‘छायाकल्प’ ग्रहण असल्याने या ग्रहणाचे वेध व इतर कोणतेही नियम कोणीही पाळू नयेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे सर्व व्यवहार, पूजा, अर्चा, कुळधर्म, कुलाचार करावेत, तसेच यावर्षी कोरोनामुळे प्रत्यक्ष वडाचे पूजन करणे शक्य होणार नाही, म्हणून वडाचे चित्र काढून घरात वटपूजन करावे. तेव्हा नेहमीप्रमाणे ५ जूनला शुक्रवारी माध्यान्हपर्यंत (दुपारी दीड वाजेपर्यंत) कोणत्याही वेळी घरी वटपूजन करावे, असे आवाहन पंचांगकर्ते मोहन दाते यांनी केले.

५ जूनला असणारं चंद्रग्रहण तब्बल ३ तास १८ मिनिटांचं आहे. हे एक पेनुमब्रल चंद्रग्रहण असेल,   म्हणजे याचा अर्थ चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या अस्पष्ट भागावरून प्रवास करीत आहे. हे चंद्रग्रहण ५ जूनला रात्री ११.१५ मिनिटांनी सुरू होईल. रात्री १२.५४ मिनिटांनी याचा सर्वाधिक परिणाम बघितला जाईल आणि ६ जूनला २.३४ मिनिटांनी ग्रहण संपेल. एक उपछाया चंद्रग्रहण असल्यामुळे याचं सुतक पाळण्याची गरज नाही.

जून महिना खगोलप्रेमींसाठी खूप खास असणार आहे. कारण या महिन्यात चंद्र आणि सूर्य दोन्ही ग्रहणे नागरिकांना बघता येणार आहेत. यातील पहिलं ग्रहण येत्या ५ जूनला आहे, हे चंद्रग्रहण आहे. तर दुसरं सूर्यग्रहण असून ते येत्या २१ जूनला दिसणार आहे. जून महिन्यातील ही दोन्ही ग्रहणे भारतात दिसणार आहेत. पाच जूनला येणारं चंद्रग्रहण भारतासोबतच युरोप, आफ्रिका, आशिया आणि आॅस्ट्रेलियामध्येही दिसणार आहे. तर २१ जूनला होणारं सूर्यग्रहण भारत, दक्षिण-पूर्व युरोप आणि आशियामध्ये दिसणार आहे. सध्या राहू आणि केतूशिवाय शनी, गुरू, शुक्र आणि प्लुटो हे चार ग्रह वक्री चालत आहेत. हे चंद्रग्रहण वृश्चिक राशीवर पडणार असल्याचेही सांगण्यात आले.

या वर्षातील चंद्रग्रहणाविषयी अशी आहे माहिती...- २०२० या सालात एकूण चार चंद्रग्रहणे आहेत. ही जगाच्या वेगवेगळ्या भागात दिसतील. २०२० चे पहिले चंद्रग्रण १०-११ जानेवारीला झाले. वर्षाचे दुसरे चंद्रग्रहण ५ जूनला आहे. हे ग्रहण रात्री ११ वाजून १६ मिनिटांनी सुरू होईल आणि ६ जूनच्या सकाळी २ वाजून ३४ मिनिटांनी संपेल. हे ग्रहण वृश्चिक राशी आणि ज्येष्ठ नक्षत्रात दिसणार आहे. २०२० मधील तिसरे चंद्रग्रहण ५ जुलैला रविवारी असेल. हे चंद्रग्रहण सकाळी ८ वाजून ३८ मिनिटांनी प्रारंभ होईल आणि ११ वाजून २१ मिनिटांपर्यंत चालेल. हे ग्रहण दिवसा असल्याने रात्री दिसणार नाही. हे ग्रहण पौर्णिमेच्या दिवशी धनू राशीत असेल. या वर्षाचे अखेरचे चंद्रग्रहण ३० नोव्हेंबरला दुपारी १ वाजून ३४ मिनिटांनी असेल, ते ५ वाजून २२ मिनिटांनी संपेल. हे ग्रहण दिवसा असल्याने भारतात दिसू शकणार नाही. हे ग्रहण रोहिणी नक्षत्र आणि वृषभ राशीत असणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक