शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

नका खाऊ तंबाखू, नका लावू चुना, हा जन्म नाही पुन्हा पुन्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 10:31 IST

पंढरपुर आषाढी वारी; माऊलींच्या पालखी सोहळ्यात व्यसनमुक्त युवक संघाचे कार्यकर्ते

ठळक मुद्देव्यसनमुक्तीबरोबरच गोरक्षा, सेंद्रिय शेती, वृक्षसंवर्धन, निर्मलग्राम आणि शौचालययुक्त गाव या विषयावरही प्रबोधन व्यसनाधिनता नष्ट व्हावी़ हा सोहळा पवित्र असून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी व्हावा यासाठी नामसाधनेबरोबरच प्रबोधनाची आवश्यकता

किरण जाधव

वेळापूर : ‘नका खाऊ तंबाखू, नका लावू चुना, माणसाचा जन्म नाही पुन्हा पुन्हा’, ‘ओढाल सिगारेट, विडी तर चढाल मृत्यूची शिडी’ या वाक्यातून आणि भारुड, कविता, पथनाट्याच्या  माध्यमातून वारकºयांना प्रबोधन करण्याचे  कार्य माऊलींच्या पालखी सोहळ्यात व्यसनमुक्त युवक संघाचे कार्यकर्ते करीत असल्याचे दिसून आले.

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी व्यसनांचे दुष्परिणाम दाखविणारे डिजिटल फलक, माहिती पत्रक, प्रबोधिका व व्यसनामुळे तोंडाची होणारी विद्रुपता दाखवणारे   विविध मुखवटे घालून व्यसनांची गंभीरता ते सांगतात. वारकºयांमध्ये मिसळून त्यांना व्यसनांचे दुष्परिणाम पटवून देतात. यामुळे कित्येक  स्त्री-पुरुष वारकरी व्यसने सोडण्याची माऊलींच्या साक्षीने शपथ घेतात. व्यसनमुक्तीबरोबरच गोरक्षा, सेंद्रिय शेती, वृक्षसंवर्धन, निर्मलग्राम आणि शौचालययुक्त गाव या विषयावरही प्रबोधन करण्यात येते.

प्रा़ धनंजय देशमुख म्हणाले, वर्तमानकाळात वाढत चाललेली व्यसनाधिनता नष्ट व्हावी़ हा सोहळा पवित्र असून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी व्हावा यासाठी नामसाधनेबरोबरच प्रबोधनाची आवश्यकता आहे़ त्यामुळे १५ वर्षांपासून हा उपक्रम बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात  येत आहे. याचा सकारात्मक परिणामही होत असल्याचे त्यांनी सांगितले.

आळंदीपासून संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, राजेंद्र कानडे, दादा पाचपुते, हनुमंत सपकळ, रवींद्र मुजुमले हे परिश्रम घेत आहेत़ यावेळी राज्याध्यक्ष शहाजी काळे, सोलापूर व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष दीपक जाधव, माळशिरस तालुकाध्यक्ष विजय पराडे, सुनील पाटील, तानाजी पांडुळे, राजू घाडगे, विजय बंडगर, दिग्विजय देशमुख आदी उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारी