शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आता गोड बोलणाºया पोपटाला फसू नका; सुशीलकुमार शिंदे याचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 12:16 IST

मंगळवेढा :  देशाचे नेते शरद पवार यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. मलाही आग्रह होत आहे. मी हायकमांड सांगेल तेच ...

ठळक मुद्देदेशाचे नेते शरद पवार यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. मलाही आग्रह होत आहे. मी हायकमांड सांगेल तेच करणार - सुशीलकुमार शिंदे तुमची साथ असायला हवी. नाहीतर पोपट येऊन गोड बोलून जातात. आपण अशा पोपटांच्या बोलण्याला फसतो - सुशीलकुमार शिंदे

मंगळवेढा :  देशाचे नेते शरद पवार यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. मलाही आग्रह होत आहे. मी हायकमांड सांगेल तेच करणार, त्यास तुमची साथ असायला हवी. नाहीतर पोपट येऊन गोड बोलून जातात. आपण अशा पोपटांच्या बोलण्याला फसतो. आपल्या तालुक्यातही एक पोपट आहे. तो तुम्हाला गोड बोलून फसविण्याची शक्यता आहे. गोड बोलणाºयांपेक्षा काम करणाºयांकडे आपण लक्ष दिले पाहिजे. असे मत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.

येथील जगदंब बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आ़ भारत भालके यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्वरोगनिदान आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी माजी आमदार राजन पाटील हे होते़ यावेळी विठ्ठल कारखान्याचे संचालक भगीरथ भालके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, नगराध्यक्षा अरुणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, काँग्रेसचे पक्षनेते चेतन नरोटे, तालुकाध्यक्ष सुरेश कोळेकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अजित जगताप, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, युवराज शिंदे, महेश दत्तू, अ‍ॅड. मनीष मर्दा उपस्थित होते.

सुशीलकुमार शिंदे म्हणाले, आज दुष्काळाची परिस्थिती आहे. माणसांना पाण्याची भ्रांत आहे. आरोग्याच्या अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस मोफत आरोग्य शिबिराने करणे ही अभिनंदनीय बाब आहे. या कार्यक्रमासाठी पै़ मारुती वाकडे, विजयकुमार खवतोडे, नगरसेवक प्रवीण खवतोडे, अ‍ॅड. मनीष मर्दा, दिलीप मर्दा, सचिन शिंदे, सचिन घुले, युवराज घुले, अशोक गुंगे, चंद्रकांत काकडे, मेजर मुरलीधर घुले, कैलास कोळी, युवराज घुले, रवींद्र घुले, संदीप घुले, संदीप फडतरे, दीपक घुले, डॉ. नंदकुमार शिंदे, नंदकिशोर मालाणी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संयोजक चंद्रकांत घुले यांनी केले. सूत्रसंचालन कवी इंद्रजित घुले यांनी केले. 

यांनी केली रुग्णांची तपासणीजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अंदूरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी एस. पी. कुलकर्णी, हृदयविकार तज्ज्ञ डॉ. एम. के. इनामदार, सर्जन डॉ. एम. आर.टकले, डॉ. अमित गुंडेवार, डॉ. नंदकुमार शिंदे, डॉ. करण व्होरा, डॉ. मेनकुदळे, डॉ. प्रवीण सारडा, डॉ. प्रसाद कोरुलकर, डॉ. देवदत्त पवार, डॉ. स्वप्नील कोठाडिया, डॉ. अतुल भालके, डॉ. पुष्पांजली शिंदे, डॉ. अश्विनी डोके यांनी रुग्णांची तपासणी केली़ 

मागच्या चुका पुन्हा होऊ नयेत : राजन पाटीलच्- सामान्य माणसांच्या हिताचे बोलण्याऐवजी उद्रेक कसा होईल मागच्यावेळी चुका केल्या त्या चुका पुन्हा होऊ नयेत एवढीच आता खबरदारी घ्यावी लागेल, असे त्यांनी सांगितले़ यावेळी भगीरथ भालके यांनी मनोगत व्यक्त केले़

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस