शहरं
Join us  
Trending Stories
1
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
2
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
3
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
4
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
5
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
6
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
7
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
8
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
9
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
10
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या
11
Sanjay Nirupam: "राज ठाकरेंनी नवा छंद जोपासलाय, ते...", संजय निरुपम नेमकं काय बोलून गेले? पाहा
12
"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
13
Diwali Bonus: मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात, मिळाला 'इतका' बोनस!
14
Laxmi Pujan 2025 Wishes: लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
15
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
16
OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल
17
पुढच्या वर्षी 1.60 लाखपर्यंत पोहोचू शकतं सोनं; चांदी कितीपर्यंत वधारणार? जाणून डोळे फिरतील!
18
टायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, q2 च्या रिझल्टने गुंतवणूकदार खुश!
19
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
20
दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Nifty २५,८४३ वर बंद, उद्या मुहूर्त ट्रेडिंग

मासिक पाळीवर प्रबोधन करणाºया केत्तूरच्या दांपत्याच्या दिल्लीत डंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 15:08 IST

आशा कापडी पॅडची राष्ट्रीय अहवालात निवड; जनजागृती कार्याची राष्ट्रीय अहवालात नोंद

ठळक मुद्देआतातरी लोकांनी शहाणे व्हावे आणि खुलेपणाने स्त्रियांच्या प्रश्नांचा विचार करावामहिलांनी मासिक पाळीच्या अंधश्रद्धेतून बाहेर यावं तेव्हाच खरा अंत्योदय होईलस्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही देशातील २० टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली आणि शिक्षणापासून वंचित

कोर्टी : केत्तूर (ता़ करमाळा) येथील सचिन आशा सुभाष आणि शर्वरी सुरेखा अरुण या तरुण या दांपत्याने निर्माण केलेल्या ‘आशा कापडी पॅड’चा आविष्कार आणि मासिक पाळीदरम्यान येणाºया समस्यांबाबत जनजागृती केल्याच्या कार्याची राष्ट्रीय अहवालात निवड केली. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहयोगाने राष्ट्रीय सामाजिक दायित्व मंचाने ३५ राज्यांतून निवडलेल्या सामाजिक कामांमध्ये त्यांचा समावेश केला.

सचिन आशा सुभाष आणि शर्वरी सुरेखा अरुण या तरुण दांपत्याने महिलांच्या मासिक पाळीसदर्भात जनजागृती केली. देशातील ६४ टक्के महिला अजूनही मासिक पाळीच्या काळात योग्य शोषक साहित्य वापरत नाहीत. अशा महिलांपर्यंत मासिक पाळीविषयी जनजागृती करण्याचे व कापडी आशा पॅड पोहोचवण्याचे काम समाजबंध संस्था करते. पुण्यात पॅड बनवण्याचा प्रकल्प असून पुण्याबाहेरही गडचिरोली, नागपूर, मेळघाट भागात जाऊन हे काम केले जाते, असे सचिन व शर्वरी यांनी सांगितले.

अंत्योदयासाठी काम करणाºया संस्थांच्या कामावरील राष्ट्रीय अहवालाचे नुकतेच दिल्लीत उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रकाशन झाले. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही देशातील २० टक्के जनता दारिद्र्यरेषेखाली आणि शिक्षणापासून वंचित आहे. त्यांचा विकास करायचा असेल तर सरकार आणि सामाजिक संस्थांना जबाबदारी उचलावी लागणार आहे़ त्याशिवाय अंत्योदय होणे शक्य नाही, असे उपराष्ट्रपतींनी सांगितले़

महिलांनी अंधश्रद्धेतून बाहेर पडावे २१ व्या शतकातही समाजाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्षित केलेल्या महिलांच्या नैसर्गिक प्रश्नांवर समाजबंध ही संस्था कार्यरत आहे़ मात्र संस्थेचा हा सन्मान नसून या स्त्री-पुरुष समतेच्या विचारांचा हा सन्मान आहे़ त्यामुळे आतातरी लोकांनी शहाणे व्हावे आणि खुलेपणाने स्त्रियांच्या प्रश्नांचा विचार करावा, महिलांनी मासिक पाळीच्या अंधश्रद्धेतून बाहेर यावं तेव्हाच खरा अंत्योदय होईल, असे समाजबांधव संस्थेच्या समुपदेशक शर्वरी सुरेखा अरुण यांनी सांगितले़

मासिक पाळी हा प्रत्येकाच्या घरातील विषय आहे, पण त्यावर खुलेपणाने बोलले जात नाही़ मात्र आम्ही याबाबत जनजागृती करीत असतो़ त्याची दखल राष्ट्रीय अहवालात केल्याचा आनंद आहे, पण जेव्हा या विषयाचा घरातील चर्चेत समावेश होईल तेव्हा अधिक आनंद होईल.- सचिन आशा सुभाष,समाजबंध- समन्वयक

टॅग्स :SolapurसोलापूरWomenमहिलाPregnancyप्रेग्नंसीHealthआरोग्यMedicalवैद्यकीय