शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर; व्यापारी, उद्योजकांची बैठक!

By appasaheb.patil | Updated: March 9, 2024 18:16 IST

सोलापूर जिल्हा हा कामगारांचा जिल्हा असल्याचाही केला उल्लेख

आप्पासाहेब पाटील, सोलापूरसोलापूर जिल्हा हा कामगारांचा जिल्हा आहे. येथील उद्योजक व व्यापारी यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांची संख्या खूप मोठी आहे, त्यामुळे लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदानाच्या दिवशी सर्व उद्योजक व व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या सर्व कामगारांना पगारी पूर्ण दिवसाची सुट्टी द्यावी व लोकशाहीच्या या उत्सवात सर्व कामगारांचे योगदान मिळण्यासाठी त्यांचे प्रबोधन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी संघटना यांची लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदान टक्केवारीत वाढ करण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते.  जिल्ह्यातील सर्व उद्योजक व व्यापाऱ्यांनी लोकशाहीच्या उत्सवात स्वतःसह त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांचा ही सहभाग घ्यावा. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये उद्योजक व व्यापाऱ्यांकडे काम करणारा एक ही कामगार मतदानाच्या पवित्र कर्तव्यापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व आस्थापनांनी प्रशासनाला सहकार्य करावे. मतदानाच्या दिवशी भर पगारी कामगारांना सुट्टी देण्याचे निर्देश आहेत. या निर्देशाचे पालन जिल्ह्यातील सर्व उद्योजक, व्यापारी यांनी काटेकोरपणे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. 

जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदान करण्याविषयी जागृत केले जात आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे १८ वर्षे वय पूर्ण झालेले आहे तसेच ज्यांनी आतापर्यंत मतदार म्हणून नाव नोंदणी केलेली नाही त्यांची नाव नोंदणी करून त्यांना मतदान कार्ड देण्याचा उपक्रम मोठ्या प्रमाणावर घेतला जात असून, या उपक्रमास जिल्ह्यात चांगला प्रतिसादही मिळत आहे. असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

टॅग्स :VotingमतदानSolapurसोलापूरbusinessव्यवसाय