शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील धान्य वितरण व्यवस्था विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 12:32 IST

रेशन दुकानदारांच्या तक्रारी : कंत्राटदार प्रशासनावर वरचढ

ठळक मुद्दे१ ते १५ तारखेपर्यंत रेशन दुकानांमधून धान्य वाटप होणे अपेक्षितरेशन दुकानदारांना धान्य पुरविणारी यंत्रणा पुन्हा विस्कळीतजिल्हा प्रशासनाच्या स्तरावरही कागदी घोडे नाचविण्याचे काम

सोलापूर : जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना धान्य पुरविणारी यंत्रणा पुन्हा विस्कळीत झाल्याच्या तक्रारी रेशन दुकानदार करीत आहेत. शासनाने नेमलेला वाहतूक कंत्राटदार जिल्हा प्रशासनावरच वरचढ झाल्याचे रेशन दुकानदारांचे म्हणणे आहे. 

शासनाने आता थेट दुकानदारांपर्यंत धान्य पोहोचविण्याची योजना सुरु केली आहे. जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना अन्नधान्य पुरवठा करण्याचा ठेका मुंबईतील एका कंपनीला देण्यात आला आहे. या कंपनीकडे राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्याचे काम देण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातही आॅगस्ट २०१७ पासून मुंबईची कंपनी पुरवठा करीत आहे.

शासन निर्देशानुसार दर महिन्याच्या १ ते १५ तारखेपर्यंत रेशन दुकानांमधून धान्य वाटप होणे अपेक्षित आहे, परंतु आॅक्टोबर २०१७ पासून जिल्ह्यातील अनेक तालुक्यात वेळेवर धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. पुरवठादार थेट तालुक्याच्या गोदामामध्येच धान्य पोहोच करतो. तिथून दुकानापर्यंत घेऊन जाण्यासाठी हमाली आणि वाहतूक खर्च द्यावा लागतो, असेही दुकानदारांचे म्हणणे आहे. यासंदर्भात जिल्हा पुरवठा विभागाने रेशन दुकानदार आणि पुरवठादाराची बैठकही घेतली होती, परंतु अद्यापही दुकानदारांच्या तक्रारी थांबलेल्या नाहीत. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरही कागदी घोडे नाचविण्याचे काम होत आहे. 

जिल्ह्यातील अन्नधान्य वितरण यंत्रणा विस्कळीत झाली आहे. आॅक्टोबर २०१७ पासून आजतागायत पुरवठादाराला २७ नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. पुन्हा २८ वी नोटीस देत आहोत. वाहतुकीत गोंधळ आणि रेशन दुकानदारांच्या तक्रारी असल्या तरी आजवर जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना वेळेवर धान्य मिळावे यासाठी पाठपुरावा सुरु आहे.- रामचंद्र उगले, जिल्हा पुरवठा अधिकारी 

आम्ही सर्वप्रकारची वाहतूक यंत्रणा चांगल्या पद्धतीने लावलेली आहे. प्रशासनाने आजवर दिलेल्या सर्व नोटिसींना उत्तरही दिलेले आहे. तालुक्याच्या गोदामाला धान्याची गाडी पाठविल्यानंतर बºयाचदा लवकर रिकामी होत नाही. तिथे हमाल नसतात. गाडी तिथेच थांबून राहते. अनेकदा प्रशासनाकडून परमीटही वेळेवर मिळत नाही. केवळ आमच्याच बाजूने अडचणी आहेत, असे नाहीत. - रमेश शहा, वाहतूक कंत्राटदार 

रेशन दुकानदारांना वेळेवर धान्य मिळत नाही असे आम्ही आॅक्टोबरपासून सांगत आहोत. प्रशासनाला निवेदनही दिले आहे. वेळेवर धान्यच दिले नाही तर आम्ही वेळेवर कसा पुरवठा करणार. प्रशासनाने यावर कायमस्वरुपी तोडगा काढणे अपेक्षित आहे.- बापू गंदगे, अध्यक्ष, जिल्हा रेशन दुकानदार संघटना 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय