शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

वकिलाच्या प्रेताची विल्हेवाट; सराफाने दागिने विकत घेतल्याचा उल्लेख गुन्ह्यात का नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 12:20 IST

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा पोलीस अधिकाºयांना सवाल;  चार आरोप प्रस्तावित करण्याच्या सूचना 

ठळक मुद्देअ‍ॅड. राजेश कांबळे यांच्या खूनप्रकरणी नातेवाईकांच्या मागणीवरून सरकार पक्षातर्फे  विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्याने ते मंगळवारी सकाळी ११ वाजता सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयात आले खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेताची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला आणि सराफाने दागिने विकत घेतल्याचा आरोप

सोलापूर : सोलापुरात गाजलेल्या अ‍ॅड. राजेश कांबळे यांच्या खून खटल्यातील आरोपींवर निश्चित करण्यात आलेल्या आरोपात सुधारणा करण्यात यावी, असे सुचविताना खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी वकिलाच्या प्रेताची विल्हेवाट अन् सराफाने दागिने विकत घेतल्याचा उल्लेख गुन्हा नोंदवताना का केला नाही? असा सवाल तपास अधिकाºयांना केला. दरम्यान, चार आरोप प्रस्तावित करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. 

अ‍ॅड. राजेश कांबळे यांच्या खूनप्रकरणी नातेवाईकांच्या मागणीवरून सरकार पक्षातर्फे  विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्याने ते मंगळवारी सकाळी ११ वाजता सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयात आले होते. संजय उर्फ बंटी खरटमल व अ‍ॅड. सुरेश चव्हाण या दोघांनी खुनाचा कट रचला होता. रचलेल्या कटानुसार खून करण्यात आला. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेताची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला आणि सराफाने दागिने विकत घेतल्याचा आरोप प्रस्तावित करावा, असे चार सुधारित प्रस्ताव न्यायाधीशांसमोर सादर केले. यावर न्यायालयाने आरोपींना म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणी मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. मिलिंद थोबडे, अ‍ॅड. विनोद सूर्यवंशी, आरोपी अ‍ॅड. सुरेश चव्हाण याच्यातर्फे अ‍ॅड. नामदेव चव्हाण तर सराफातर्फे अ‍ॅड. धनंजय माने हे काम पाहत आहेत.

निकम यांचा सोलापूर शहरातील पहिलाच खटला- विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी महाराष्ट्रातील अनेक नामांकित खटले चालवले आहेत. खटल्यात बहुतांश आरोपींना फाशी व जन्मठेपेच्या शिक्षा मिळाल्या आहेत. सोलापुरात गाजलेल्या या खून खटल्यासाठी प्रथमच त्यांची नियुक्ती झाली आहे. १५ ते २० वर्षांपूर्वी त्यांची पंढरपूर येथील धुळा कोळेकर खून प्रकरण व अन्य एका गंभीर गुन्ह्याच्या खटल्यासाठी नियुक्ती झाली होती. त्यानंतर सोलापूर शहरात खटला चालवण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची खटल्यासाठी नियुक्ती झाल्याने शहर-जिल्ह्यातील लोकांना निकालाची उत्सुकता वाढली आहे. 

खटल्याची पार्श्वभूमी...- गुलबर्गा येथील मोठी केस देण्याचा बहाणा करून ८ जून २०१९ रोजी आरोपी संजय उर्फ बंटी खरटमल याने अ‍ॅड. राजेश कांबळे यांना तालुका पोलीस ठाण्याच्या पाठीमागील पांडुरंग वस्तीतील स्वत:च्या राहत्या घरी नेले होते. घरात चहामध्ये गुंगीचे औषध घालून पिण्यास दिले. त्यानंतर डोक्यात हातोडा घालून खून केला होता. विल्हेवाट लावण्यासाखी त्याने अ‍ॅड. राजेश कांबळे यांच्या शरीराचे सहा तुकडे केले. ते पोत्यात भरून ठेवले, मात्र वेळ आवश्यक असणारे वाहन मिळत नसल्याने प्रेताची विल्हेवाट लावता येत नव्हती. प्रेत घरातच असल्याने त्याची दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली होती. मिळालेल्या माहितीवरून पोलीस शोध घेत दि. १२ जून २०१९ रोजी बंटी खरटमल याच्या घरी गेले. दाराला कुलूप होते, मात्र आतमधून दुर्गंधी येत होती.

पोलिसांना संशय आल्यानंतर दार तोडण्यात आले, तेव्हा पोत्यामध्ये अ‍ॅड. राजेश कांबळे यांचे तुकडे केलेले प्रेत आढळून आले होते. बंटी खरटमल याला गुलबर्गा येथून अटक करण्यात आली होती, त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा खून अ‍ॅड. सुरेश चव्हाण याच्या सांगण्यावरून केल्याची कबुली दिली होती. 

- केवळ अ‍ॅड. राजेश कांबळे यांच्या अंगावरील लॉकेट, हातातील अंगठ्या आणि खिशातील रोख रकमेसाठी खून केल्याचे सांगितले होते. या प्रकरणी अ‍ॅड. सुरेश चव्हाण व सोने विकलेल्या सराफालाही सदर बझार पोलिसांनी अटक केली होती. सराफाला जामीन मिळाला आहे, मात्र बंटी खरटमल व अ‍ॅड. सुरेश चव्हाण हे दोघे जेलमध्ये आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयUjjwal Nikamउज्ज्वल निकमadvocateवकिल